lang="en-US"> Fertilizers | बातमी शेतकऱ्यांच्या फायद्याची! खरिप हंगामासाठी तब्बल ८५ हजार - मी E-शेतकरी

Fertilizers | बातमी शेतकऱ्यांच्या फायद्याची! खरिप हंगामासाठी तब्बल ८५ हजार ४५१ टन रासायनिक खते मंजूर, पाहा कोणकोणती?


Fertilizers | हिंगोली जिल्ह्याला यावर्षीच्या (२०२४) खरिप हंगामासाठी कृषी विभागाने ८२ हजार ५१ टन खतांची (Fertilizers) मागणी केली होती. या मागणीनुसार कृषी आयुक्तलयाने विविध ग्रेडच्या ८५ हजार ४५१ टन रासायनिक खते मंजूर केली आहेत. यात नॅनो युरियाच्या १७ हजार ६०० व नॅनो डिएपी २ हजार बॉटल्सचा समावेश आहे.

खत मंजुरीचे तपशील:
• एकूण मंजूर खत: ८५ हजार ४५१ टन
• मागणी केलेले खत: ८२ हजार ५१ टन
• यंदाच्या मागणीपेक्षा जास्त: ३ हजार ४०० टन
• गतवर्षीच्या तुलनेत जास्त: ७ हजार ८९१ टन
• जिल्ह्यात प्रस्तावित पेरणी: ३ लाख ११ हजार ४०४ हेक्टर
• जिल्ह्याचा सरासरी खत वापर: ८१ हजार ५६९ टन

वाचा: अर्रर्र..! सोयाबीनचे दर पुन्हा दबावात; पण तुरीचे दर सुसाट, जाणून घ्या ताजे बाजारभाव

मंजूर खतांचे प्रकार आणि प्रमाण:
• युरिया: १६ हजार २०० टन
• डिएपी: १५ हजार ८०० टन
• पोटॅश-एमओपी: ३ हजार ३०० टन
• सुपर फॉस्फेट: १६ हजार १०१ टन
• अमोनियम सल्फेट: ५० टन
• संयुक्त खते (एनपीके): ३४ हजार टन

हेही वाचा: आज रामनवमीच्या दिवशी ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार विशेष लाभ; लगेच वाचा तुम्हाला देणार का नशीब साथ?

खताचा पुरवठा:
• एप्रिल महिन्यासाठी मंजूर खत: ५ हजार ९९ टन
• आतापर्यंत पुरवठा केलेला खत: २ हजार ५९० टन
• मार्च अखेरीस शिल्लक असलेले खत: ३१ हजार १४६ टन

हिंगोली जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेरीस शिल्लक असलेल्या खताचा पुरवठा आणि एप्रिल मधील पुरवठा मिळून एकूण ३३ हजार ७३६ टन खताचा साठा शिल्लक आहे.

Exit mobile version