Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ योजनेसाठी तब्बल 104 कोटींचा निधी मंजुर; जाणून घ्या सविस्तर
Yojana| शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान देणारी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना होय. तर शेतकऱ्यांना (Agriculture) या योजनेंतर्गत फळबाग बागांसाठी अनुदान (Subsidy) दिले जाते. त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना मनरेगा आणि पोखरा योजनेअंतर्गत देखील फळबागांसाठी अनुदान (Orchard Subsidy) दिले जाते. मात्र बरेच शेतकरी या योजनांमध्ये अपात्र ठरतात. म्हणूनच शेतकऱ्यांना फळबागांसाठी लाभ (Financial) मिळावा यासाठी राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबवली जाते. याच योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
2022-23 मध्ये योजना राबविण्यास मंजुरी
कोरोनाच्या काळात भाऊसाहेब फुंडकर फळबाग ही योजना (Yojana) राबवली गेली नव्हती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये. ही योजना बंद पडली की काय? असा संभ्रम निर्माण झाला होता. त्याचबरोबर 2022- 23 मध्ये देखील ही योजना जाईल की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आले आहे. बरेच शेतकरी या योजनेसाठी पात्र होण्याची अपेक्षा होती. आता त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणारं आहे.
वाचा: राज्य शासन ‘या’ योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी देतंय 100% अनुदान, ‘असा’ घ्या योजनेचा लाभ
104 कोटींचा निधी मंजूर
4 ऑक्टोबर 2022 रोजी या योजनेला राबवण्यासाठी एक शासन निर्णय घेऊन 2022-23 मध्ये राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी तब्बल 104 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ 5 जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 14 ऑक्टोबरपूर्वी होणारं शंभर टक्के पीक विम्याचं वाटप
- शेतकऱ्यांनो आता अन्न प्रक्रिया उद्योगाचा करा विचार; सरकारही ‘या’ योजनेंतर्गत देतंय अनुदान
Web Title: Good news for farmers! As much as 104 crores of funds sanctioned for this scheme; Know in detail