ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना
ट्रेंडिंग

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविण्यास मंजुरी; शेतकऱ्यांसाठी फायदेशीर, 68 कोटी रुपयांचा निधी जाहीर..

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळवून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील तरुणांना बेरोजगारांना शेतकर्यांच्या मुलांना स्वताचा उद्योग सुरु करण्यासाठी अनुदान देणारी एक महत्वपूर्ण अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना. हि योजना महाराष्ट्र मध्ये २०२१ -२२ मध्ये राबविण्याकरिता मंजुरी देणारी एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय १२ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेला आहे.

वाचा –

शेतकरी वर्षभर आपला माल पिकवतो. जेव्हा हा माल बाजारात येतो बाजारामधून भाव पाडले जातात. खूप कमी किमतीने शेतकर्यांचे माल घेतले जातात. यामुळे शेतकर्यांच्या मालाला कवडीमोलात विकला जावू नये यासाठी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून नाशवंत शेतमालावरती प्रक्रिया करून स्वताचा उद्योग निर्माण करण्यासाठी तरुणांना, बेरोजगारांना, अनुदान देवून स्वताचा उद्योग निर्माण करण्यासाठी याठिकाणी सोय करून दिली जाते. हि योजना कशाप्रकारे राबविली जाते? अनुदान किती दिले जाते? याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया..

शासन निर्णय –

राज्यातील असंघटीत अन्न प्रक्रिया क्षेत्रातील उद्योगांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत prime minister scheme for formalization of food processing enterprises (PMFME) या योजनेस केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. या पाश्वर्भूमीवर केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना PMFME हि योजना राज्यात सन २०२०-२१ पासून पुढील पाच वर्षासाठी म्हणजे सन २०२४-२५ पर्यंत राबविण्यास २३.१२.२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आली आहे.

वाचा –

1) केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) सन २०२१-२२ मध्ये राज्यात राबविण्याकरिता रु.६८.०८.३४५७७९८ कोटी एवढी रक्कम प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

सविस्तर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२११०१२१७१५४४७९०१ असा आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button