कृषी तंत्रज्ञानकृषी बातम्या

Agricultural Mechanization | शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कृषी यंत्रांसाठी अनुदान! राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेसाठी कोट्यवधींच्या निधीस मान्यता

Subsidy for farmers for agricultural machinery! Approval of crores of funds for State Sponsored Agricultural Mechanization Scheme

Agricultural Mechanization | राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना राबविण्यासप्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या कृषि यांत्रिकीकरण उप अभियानातील वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषि औजारे यंत्र खरेदीसाठी अनुदान देण्यात येते. राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेची (Agricultural Mechanization) अंमलबजावणी महा डिबीटी पोर्टलवर कृषि यांत्रिकीकरण उप अभियान योजने अंतर्गत प्राप्त अर्जामधून सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या व कामे पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येत आहे.

वाचा : Tractor Yojana | ट्रॅक्टर अनुदान योजनेत ‘हा’ मोठा बदल, जाणून घ्या ट्रॅक्टर योजना अन् बदलामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा का तोटा?

Funding for agricultural mechanization कृषी यांत्रिकीकरणासाठी निधी
सन २०२३-२४ या वर्षात राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी रू. ३७.८६०६ कोटी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (बीडीएस) वितरीत करण्यात येत असून, सदर निधी सन २०२३-२४ करिता खालील लेखाशिर्षाखाली अर्थसंकल्पित •केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा.

Subsidy for tractors ट्रॅक्टरसाठी अनुदान
सदर योजनेंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती / जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यासाठी किंमतीच्या ५०% किंवा रु. १.२५ लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकन्यांसाठी किंमतीच्या ४०% किंवा रु.१ लाख यापैकी कमी असेल ते या प्रमाणे अनुदान देण्यात यावे. तसेच महिला शेतकरी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शेतकरी यांच्यासाठी भौतिक/ आर्थिक लक्षांक निर्धारीत करण्यात यावे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Subsidy for farmers for agricultural machinery! Approval of crores of funds for State Sponsored Agricultural Mechanization Scheme

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button