कृषी बातम्या

बिग ब्रेकिंग! परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या निधी वितरणास मंजुरी

Crop Insurance | यंदा राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती (Agriculture) पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. याच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी (Farming) दिलासादायक बातमी समोर आली आहे. 17 नोव्हेंबर 2022 रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. या शासन निर्णयामध्ये या बाधित शेतकऱ्यांना (Agri News) मदतीचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यांना या मदतीचे वितरण होणार आहे आणि किती निधी (Financial) वितरीत करण्यात येणार आहे.

वाचा: 13व्या हप्त्यापूर्वी मोदींच शेतकऱ्यांना गिफ्ट! खात्यात येणार पूर्ण 15 लाख रुपये, त्वरीत ‘असा’ करा अर्ज

शासन निर्णय
सततच्या पावसामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना (Department of Agriculture) तब्बल 1 हजार 286 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. 10 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना (Type of Agriculture) या निधीचे वाटप करण्यात येणार आहे. 33% पेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेती (Crop Insurance) पिकांच्या नुकसानीसाठी ही मदत वितरित केली जाणार आहे.

वाचा: कापूस उत्पादकांच्या तोंडचा घास हिरावणार! ‘या’ कारणांमुळे कापसाचे दर होणार कमी

कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी?

• जालना जिल्ह्यातील 3 लाख 69 हजार 680 शेतकऱ्यांसाठी 397.73 कोटी एवढी मदत वितरित केली जाईल.
• परभणी जिल्ह्यातील 92 हजार 737 शेतकऱ्यांसाठी (Crop Insurance) 76 कोटी, 39 लाख रुपये.
• हिंगोली जिल्ह्यांमध्ये 54 हजार 876 शेतकऱ्यांसाठी 16 कोटी 80 लाख 4 रुपये मदत वितरित जाईल.
• नांदेड जिल्ह्यामध्ये 47 हजार 368 शेतकऱ्यांसाठी 25 कोटी 53 लाख मदत वितरित केली जाईल.
• औंरगाबाद जिल्ह्यामधील 2 लाख 86 हजार 010 शेतकऱ्यांसाठी 268 कोटी 12 लाख.
• बीड जिल्ह्यामधील 3 लाख 51 हजार 634 शेतकऱ्यांसाठी 410 कोटी 22 लाख रुपये मदत वितरित केली जाईल.

• लातूर जिल्ह्यामधील 15 हजार 787 शेतकऱ्यांसाठी 19 कोटी 90 लाख रुपये मदत वितरित केली जाईल.
• औरंगाबाद विभागासाठी 12 लाख 18 हजार 092 शेतकऱ्यांसाठी (Crop Insurance) 1214 कोटी 72 लाख मदत वितरित केली जाईल.
• पुणे जिल्ह्यातील 32,545 शेतकऱ्यांसाठी 30 कोटी 77 लाख व सातारा जिल्ह्यामधील 8765 शेतकऱ्यांसाठी 5 कोटी 22 लाख रुपये.
• सोलापूर जिल्ह्यातील 26 हजार 142 शेतकऱ्यांसाठी 36 कोटी 02 लाख मदत वितरित केली जाईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! Approval for distribution of funds of crores to farmers who suffered losses due to return rains

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button