योजना

Yojana | सधन कुक्कुट विकास योजनेंतर्गत ‘या’ जिल्ह्यासाठी अर्ज सुरू, जाणून घ्या पात्रता व अटी

कुक्कुट पालन अनुदान योजनेसंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील 302 तालुक्यामध्ये कुक्कुट पालनासाठी (Poultry scheme) 50 टक्केपर्यंत म्हणजेच 5 लाख 15 हजार रुपये पर्यंत अनुदान सधन कुक्कुट विकास (Intensive Poultry Development Yojana) गटाची स्थापना या अंतर्गत देण्यात येणार आहे.

Yojana | या योजनेसाठी परभणी जिल्ह्यातून (Parbhani District) अर्ज मागवण्यात आले आहेत. सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना (Intensive Poultry Development Group Establishment) योजना कशा प्रकारे राबविली जाते. कागदपत्र (Documents) काय लागतात यासोबतच आता कोणत्या जिल्ह्यातून अर्ज (Application) मागविण्यात आले आहेत ते जाणून घेऊया.

परभणी जिल्ह्याच्या अर्जासाठी शेवटची तारीख
सातारा जिल्ह्यातील 3 तालुक्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. याचप्रमाणे आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून अर्ज मागविण्यात सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातील मानवत सेलू ते पालम तालुक्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी शेवटची तारीख 30 जून 2022 आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना अर्ज करावेत अशा प्रकारचा आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त परभणी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

वाचा: Yojana | शेतकऱ्यांनो सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर मिळतय 50% अनुदान

अनुदान
सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना या योजनेंतर्गत पूर्ण प्रकल्पाची किंमत 10 लाख 27 हजार 500 रुपये आहे. यापैकी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाचे 50 टक्के अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रु. असून, राहीलेले 50 टक्के रक्कम लाभार्थी स्वतःचा उभा करेल किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उभा करु शकेल. ज्यामध्ये 30 टक्के महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे.

अटी व शर्ती
• सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जनजाती क्षेत्र उपयोजनेतील जे लाभार्थी सध्यस्थितीत कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत.
• ज्या लाभार्थींकडे लघु अंडी उबवणूक यंत्र आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत प्राधान्य.
• कुक्कुट व्यवसायात स्वयंरोजगार निर्मितीची आवड असणारे नवउद्योजकही अर्ज करु शकतात.
• प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता आवश्यक असणारी साधने, सुविधा व व्यवहार्यता पडताळून लाभार्थी निवडण्यात येतील.
• लाभार्थ्यांचे वय 18 ते 60 वर्षांच्या आत असावे.
• 25 चौरस फुटाचे स्वतःची जागा त्याच्या मालकीची असणे गरजेच आहे.

वाचा: Crop Insurance | शेतकऱ्यांच्या खात्यावर 200 कोटींचा पीक विमा जमा, जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

आवश्यक कागदपत्रे

• फोटो आयडी / आधार कार्ड / ओळखपत्राची सत्यप्रत
• बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
• लाभधारकाकडील मालमत्ता 7/12 व 8-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. 4
• कुक्कुट पालन व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेतलेल्या प्रमाणपत्रांची छायांकित सत्यप्रत
• अनु. जाती/जमातीच्या अर्जदाराकरिता जातीच्या दाखल्याची सत्यप्रत इ. कागदपत्रे अर्जासोबत जोडावयाची आहेत.
• योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त तसेच तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button