ताज्या बातम्या

“या” जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानाच्या परवान्यासाठी अर्ज सुरू; पहा कसा अर्ज कराल..

Application for license of cheap grain shop in "Ya" district started; See how to apply ..

नाशिक जिल्हा मधील अर्ज मागवण्यात आलेले आहेत. यापूर्वी सुद्धा आपण परभणी, नंदुरबार जिल्ह्यातील व अहमदनगर च्या ग्रामीण भागातील १११ जागांसाठीचे अर्ज मागवण्यात आलेले होते. याब्बद्दलच अपडेट पाहिलं होतं. याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ग्रामीण भागातील २४२ स्वस्त धान्य दुकानाच्या परवान्यासाठी याठिकाणी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. ज्याच्यासाठी १७ ऑगस्ट २०२१ पासून १७ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये अर्ज करता येणार आहेत. पंचायत (ग्रामपंचायत व तस्त्यम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट , महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था तसेच संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था. या ठिकाणी रिक्त असलेल्या जागेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

स्वस्त धान्य दुकान टाकायचं आहे का? दुकानाच्या परवान्यासाठी महत्वपूर्ण अपडेट..

या संबधित त्या गावांमध्ये तहसील कार्यालयामध्ये अर्ज उपलब्ध होणार आहेत. यासाठी तुम्हाला फक्त ५० रुपयाचा शुल्क द्यावा लागणार आहे. हा अर्ज १७ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजता तहसील कार्यालयामध्ये बंद पाकिटात जमा करायचं आहे. नाशिक जिल्ह्यामधील नाशिक ग्रामीण तालुक्यासाठी ११ जागा, इगतपुरी तालुक्यातील १७, सिन्नर तालुक्यातील १५ जागांसाठी तर दिंडोरी तालुक्यातील एकूण १९ जागांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत.

याचप्रमाणे पेठ तालुक्यातील १३ तर सुरगाणा तालुक्यातीन एकूण २२ जागासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत त्रंबकेश्वर मधील एकूण १६ जागा रिक्त आहेत. अर्ज मागवण्यात आलेले आहेत, नांदगाव तालुक्यातील ८ तर बागलाण तालुक्यातील १६, कळवण तालुक्यातील एकूण २१, देवळा तालुक्यातील ६, येवला तालुक्यातील ८ तर मालेगाव तालुक्यातील एकूण १५, चांदवड तालुक्यातील एकूण १९ आणि निफाड तालुक्यामध्ये तब्बल ३६ जागेसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. यासाठी १७ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज जमा करायचे आहेत.

अति आणि शर्ती –

पंचायत (ग्रामपंचायत व तस्यम स्थानिक स्वराज्य संस्था) , नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था तसेच संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या या सार्वजनिक संस्थेच्या माध्यमातूनच अर्ज करता येतील.

त्यासोबत स्वयंसहायक क्षेत्राचा अर्ज जोडायचा आहे. शासकीय निमशाशकीय नोकरीत नसल्या बाबतच सदस्याच स्वयं घोषणा पत्र याठिकाणी जोडायचं आहे.

अर्ज सादर करत असताना बचत गट, संस्थेच्या, स्वताच्या मालकीची जमीन असेल तर त्या जमिनीचे सातबारा उतारे जमा करायचे आहेत. सिटी सर्वे नोंद असलेलं इतर कोणी मालक असेल, भाडे करून जागा घेतली असेल तर त्या मालकाला भाडेपत्र करारनामा आणि वीज देयकाचे प्रत जडावे अशा प्रकारे अर्ज बंद लिफाफ्यामध्ये जमा करावा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button