पशुपालन आणि कुक्कटपालनासाठी ‘या’ योजनेतंर्गत 75 टक्के अनुदानावर अर्ज सुरू, जाणून घ्या प्रक्रिया
Yojana | भारतातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात. पशुपालन केल्यामुळे शेतकऱ्यांना (Dairy Business) दुग्ध व्यवसायातून आर्थिक (Financial) मदत होते. तर शेतकऱ्यांना पशुपालनाकरता प्रोत्साहन करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून (Department of Animal Husbandry) विविध योजना राबवल्या जातात. ज्यासाठी शेतकऱ्यांना (Department of Agriculture) सतत अर्ज करून लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात येत असत.
वाचा: बाप रे! महाराष्ट्रावर अस्मानी वादळाचं मोठं संकट, मुसळधार पावसासह थेट ‘या’ 13 जिल्ह्यांना अलर्ट
नावीन्यपूर्ण योजना
शेतकऱ्यांना गाई, म्हशी, शेळी आणि मेंढी पालनासाठी तसेच कुक्कटपालनासाठी अनुदान (Subsidy) देण्याकरता विविध योजना राबवल्या जातात. यापैकीच असणारी एक योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना (Farming) होय. याच नाविन्यपूर्ण योजने संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या नाविन्यपूर्ण योजनेसाठी पशुसंवर्धन विभागाकडून (Department of Agriculture) अर्ज करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट! केंद्र सरकार पंतप्रधान किसान योजनेची वाढवणार रक्कम, जाणून घ्या
तब्बल 75 टक्के मिळतय अनुदान
तर पशुपालन आणि कुक्कटपालनासाठी शेतकऱ्यांना (Farming) 75 टक्के अनुदान या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत मिळते. ही योजना राज्यस्तरावर राबवली जाते. तर या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी (Agribusiness) अनुदान मिळत आहे. ज्यासाठी शेतकऱ्यांना 17 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
वाचा: आनंदाची बातमी! पुढील महिन्यात कापसाचे दर वाढणार; जाणून घ्या चालू महिन्यात कसा राहील बाजारभाव?
कसे केले जाते वाटप?
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप केले जातात. तसेच 10 शेळ्या 1 बोकड वाटप करणे, 1 हजार कुक्कुट पिलांचे वाटप व 25 तलंगा आणि 3 नर यांचे वाटप केले जाते. या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करणे महत्वाचे आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: