शेतीसाठी लागणारी कोणतीही कृषी यंत्रे मिळणार स्वस्त दरात; सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना होणार फायदा..
प्रत्येक राज्यात कृषी यंत्र (Agricultural machinery) आणि साहित्याची किंमत समान असायला हवी. प्रत्येक ठिकाणी याचे दर वेगवेगळे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे (farmers) आर्थिक नुकसान होत आहे. भारत सरकारने(Government of India) डीलर्स आणि उत्पादकांना देशभरात समान किंमत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. गोव्यात शेती (Agriculture) विकसित करण्याच्या विषयावर चर्चा करताना मंत्र्यांनी राज्य सरकारला डिजिटल तंत्रज्ञानाचा (digital technology) वापर करण्याची तसेच पीक (Crop) उत्पादनाची क्षमता वाढविण्याची माहीती दिली. कृषी (Agriculture) खर्चाच्या महत्त्वाच्या वस्तूंची तरतूद, माती परीक्षण आणि बियाणांचे परीक्षण याबाबत सुचनाही देण्यात आल्या. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
सरकारी योजना –
शेतकरी (Farmers) सीएचसी फार्म मशीनरी अॅपवर ऑर्डर देऊन आवश्यक यंत्रसामग्री (Machinery) (साधने) अत्यंत स्वस्त दराने मागवू शकता. शेती (Agriculture) यंत्राशी संबंधित व्यवसाय करायचा असेल तर यामधून लाखोंचा उत्पन्न हे मिळणार आहे. शिवाय 80 टक्के पर्यंत केंद्र सरकार (Central Government) य़ाला अनुदान देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वाचा –
- “या” फळाची बाजारात दमदार एंट्री; खरेदीसाठी ग्राहकांची होतेय प्रचंड गर्दी, पहा या फळाचे काय आहेत दर..
खासगी जकात भाड्याने देणारे केंद्र (सीएचसी) स्थापन केले, तर सरकार त्याला 40 टक्के अनुदान देत आहे. या माध्यमातून शेती उत्पादक कंपन्यांना 60 लाख रुपयांपर्यंतचे प्रकल्प मंजूर होतात. त्यामुळे त्या भागातील शेतकरी त्यांच्या गरजेनुसार यंत्राची खरेदी करू शकतात.
शेतकरी कंपन्यांना अनुदान –
शेती (Agriculture) उत्पादक कंपनीला 24 लाख पर्यंतचे अनुदान राहणार आहे. जर या कंपनीने मशीन बँक तयार केली तर या गटात 6 ते 8 शेतकरी असणे आवश्यक आहे. यामध्ये 10 लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात येणार आहे. पैकी 8 लाखाचे अनुदान हे सरकारचे राहणार आहे.
अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधव आपापल्या राज्य कृषी विभागाच्या अभियांत्रिकी विभागाशी संपर्क साधण्याचे अवाहन केंद्रीय कृषी राज्य शोभा करंडलाजे यांनी केले आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा