Ration Card | सामान्यांसाठी खुशखबर! ‘या’ रेशन कार्डधारकांना मिळणारं 21 किलो गहू, 14 किलो तांदूळ, तेल आणि मीठ मोफत
Ration Card | जर तुम्ही शिधापत्रिकाधारक असाल आणि मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण सरकारने शिधापत्रिकाधारकांना (Free Ration) 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच सरकारने मोफत (Financial) रेशनसोबत तेल आणि मीठाची पाकिटेही मोफत मिळणार असल्याचे जाहीर केले. आता रेशन कार्डधारकांना (Ration Card) 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच आतापासून ग्राहकांना अधिकाधिक गहू आणि तांदूळाचा लाभ मिळणार आहे.
रेशन कार्डधारकांना मिळणार मोफत शिधा
अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तर सामान्य शिधापत्रिकाधारकांना (Ration Card) फक्त 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ मिळेल. मात्र, यावेळी कार्डधारकांना गव्हासाठी किलोमागे 2 रुपये आणि तांदळासाठी 3 रुपये प्रतिकिलो खर्च करावा लागणार आहे.
वाचा: आनंदाची बातमी! आता ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 10 हजार रुपये; त्वरित जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?
ग्राहकांना होणार मोठा फायदा
सरकार देशभरातील शिधापत्रिकाधारकांना अनेक सुविधा देत असून, त्यामुळे ग्राहकांना (Agri News) मोठा फायदा होत आहे. यासोबतच कोरोनाच्या काळापासून आतापर्यंत कोट्यवधी लोकांना सरकारने मोफत रेशनची सुविधा (Ration Facility) उपलब्ध करून दिली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लोकांना त्याचा लाभ दिला जात आहे.
तेल आणि मीठ मिळेल मोफत
यासोबतच ज्या शिधापत्रिका चालकांकडे मीठ, तेल, हरभरा यांची पाकिटे शिल्लक आहेत, त्यांना शासनाच्या आदेशानुसार अंत्योदय कार्डधारकांना (Department of Agriculture) मोफत वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य हा नियम पाळला जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. म्हणजे जो पहिला येईल त्याला तेल आणि मीठ फुकट मिळेल आणि तेल आणि मीठ संपल्यावर मिळणार नाही.
वाचा: पुन्हा सोयाबीन उत्पादकांवर वाईट दिवस! बाजारात ‘इतक्या’ रुपयांनी नरमले दर, जाणून घ्या कारण?
लाखो कार्डे करण्यात आली आहेत रद्द
सध्या देशभरातील 80 कोटींहून अधिक लोकांना गरीब कल्याण योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र आतापर्यंत सरकारने सुमारे 10 लाख कार्डधारकांची कार्डे रद्द केली आहेत. रेशनकार्डच्या सुविधेचा (Type of Agriculture) लाभ अनेक अपात्र लोकही घेत आहेत, त्यामुळे सरकारने सर्व अपात्र लोकांची कार्डे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अपात्र कार्डधारकांचा डाटा डीलर्सना पाठवला जात आहे, जेणेकरून या लोकांवर कडक कारवाई करून त्यांच्याकडून रेशन वसूल करता येईल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रातील तब्बल 16 लाख शेतकऱ्यांना ‘इतक्या’ कोटींची नुकसान भरपाई
- कापूस उत्पादकांच्या तोंडचा घास हिरावणार! ‘या’ कारणांमुळे कापसाचे दर होणार कमी
Web Title: Good news for common people! 21 kg wheat, 14 kg rice, oil-salt free for ration card holders