ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Subsidy | आनंदाची बातमी! 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी आली; त्वरित तपासा तुमचं नाव आलं का?

Subsidy | नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबर समोर आली आहे. 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची (Crop Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान (Subsidy) शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत (Lifestyle) मिळणार आहे. आता याच अनुदानाच्या पात्र शेतकऱ्यांची (Agriculture) दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात तुमचं नाव या यादीत आहे का नाही.

वाचा:सामान्यांसाठी धमाकेदार ऑफर! एलपीजी गॅस बुक करून मिळवा 200 रुपयांचा कॅशबॅक; जाणून घ्या कसा मिळेल बंपर डिस्काउंट

प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी जाहीर
50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची (Subsidy) दुसरी यादी ऑनलाईन प्रकाशित करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये अनेकांना यावर यादी दिसणार नाही. ज्याचं कारण म्हणजे कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहे. त्याचप्रमाणे हळू हळू इतर जिल्ह्यांच्या (Lifestyle) याद्या देखील या csc पोर्टलवर प्रकाशित होत आहे. मात्र काही जिल्ह्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या नाहीत त्या शेतकऱ्यांना (Department of Agriculture) अद्याप दिसणार नाहीत. यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागेल.

ही’ प्रक्रिया आवश्यक
शेतकऱ्यांना 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी kyc प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. आता या दुसऱ्या यादीत तुमचं नाव आल्यानंतर तात्काळ kyc प्रक्रिया करून घ्यावी. तरचं शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळू शकते.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार विहिरीसाठी ‘इतकं’ वाढीव अनुदान; महत्त्वपूर्ण अटही रद्द

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणारं तीन टप्प्यांत
• शेतकऱ्यांची पहिली यादी- 8.29 लाख
• अनुदानची रक्कम – 4,000 कोटी

• शेतकऱ्यांची दुसरी यादी- 10 लाख
• अनुदानाची रक्कम- 5,000 कोटी

• शेतकऱ्यांची तिसरी यादी- 4.85 लाख
• अनुदानाची रक्कम- 1,200 कोटी

वाचा: ब्रेकिंग न्युज: आत्ता मिळणार पैसा च पैसा..कापसाचे होणार भरघोस उत्पादन उत्पादन ! ‘ हे ‘ नवीन वाण विकसित ..!

कशी पाहाल ऑनलाईन लाभार्थी यादी?
csc च्या पोर्टलवर त्याच शेतकऱ्यांना याद्या पाहता येतील ज्या शेतकऱ्यांचे csc पोर्टलवर अधिकृतता (Authorization) असेल. यासाठी तुम्हाला csc पोर्टलवर कर्ज सर्च करावं लागेल. यानंतर तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची लिंक दिली जाईल. यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्ही त्या पोर्टलवर जाल. त्यावर तुम्हाला लिस्ट हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे. यानंतर तुम्हाला तेथे जिल्ह्याचे नाव टाकावे लागेल. त्यांनतर A पासून Z पर्यंत तालुक्यांची नावे दिली जातील. तालुका निवडल्यानंतर तुम्हाला गावांची नावे दिसतील. तुम्ही ज्या गावातील असाल त्या गावाची लाभार्थी यादी तुम्ही पाहू शकता. यानंतर तुम्हाला केवायसी साठी सूचना करण्यात येतील. जर यावर तुमची माहिती चुकीची असल्यास बँकेत आक्षेप नोंदवावा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button