ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Anganwadi Workers | मोठी बातमी ! अंगणवाडी सेविकांसाठी मोठा दिलासा! प्रमोशन, विमा, नवे फोन आणि बरंच काही …

Anganwadi Workers | Big news! Big relief for Anganwadi workers! Promotions, insurance, new phones and much more...

Anganwadi Workers | महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांसाठी आज एक मोठा दिलासादायक निर्णय जाहीर झाला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबईत झालेल्या प्रधानमंत्री मातृ वंदन योजना कार्यक्रमात ही घोषणा केली.

यानुसार, (Anganwadi Workers) अंगणवाडीच्या हेल्पर म्हणून काम करणाऱ्या 3 हजार सुशिक्षित महिलांना तात्काळ प्रमोशन दिले जाणार आहे. यासोबतच त्यांना 11 हजार 800 रुपये प्रत्येक नव्या फोनसाठी पाठवले जातील. यातून सर्वांना नवे फोन दिले जाणार आहे.

अंगणवाडी महिलांना विमा सुरक्षा दिली जाणार असून या विम्याचे पैसे सरकार भरणार आहे. महिला सशक्ती करणाबाबत आदीती तटकरे व मंगलप्रभात लोढा यांनी एकत्रित बसून काय करता येईल ते सांगावे, असे आवाहन स्मृती इराणी यांनी केले.

यासोबतच राज्यात 1 हजार पाळणाघर सुरू करणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. तसेच महाराष्ट्रात निर्भया फंडसाठी कुठलीही कमतरता राहणार नसून केंद्राकडून सर्व सहकार्य केलं जाईल, असेही त्यांनी सांगितले.

वाचा : Onion Rates | कांद्याचे दर गगनाला भिडले: पण का वाढले भाव, जाणून घ्या त्याला कारण कोण..

मुख्यमंत्री काय म्हणाले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंगणवाडी भाऊबीज पैसे मिळाले का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळेस महिलांनी पैसे मिळाले नाही, असे एकसुरात सांगितले. दिवाळी आधी तुम्हाला पैसे मिळतील. फाईलवर सही झाली आहे, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. यासोबत मोबाईल देखील तुम्हाला मिळतील. आशा वर्करस यांनाही मानधन वाढ करु अशी घोषणाही त्यांनी केली.

या निर्णयामुळे अंगणवाडी सेविकांचा वर्ग मोठ्या प्रमाणात समाधानी झाला आहे. त्यांनी या निर्णयासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

या निर्णयामुळे अंगणवाडी सेविकांचे सामाजिक आणि आर्थिक स्थान मजबूत होण्यास मदत होईल. तसेच, त्यांना त्यांच्या कामात अधिक प्रेरणा मिळेल.

हेही वाचा :

Web Title : Anganwadi Workers | Big news! Big relief for Anganwadi workers! Promotions, insurance, new phones and much more…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button