कृषी बातम्या
गव्हाच्या किमतींमध्ये वाढ तर हरभऱ्याच्या किमतीमध्ये घट होण्याची शक्यता; पहा ते कारण कोणते?
गेल्या काही दिवसात महाराष्ट्र मध्ये तसेच मध्यप्रदेश मध्ये अवकाळी पावसाने व गारपिटीने बरेच थैमान घातले. त्यामुळे बरेच शेतीच्या पिकांची हानी झाली. त्यात प्रामुख्याने गहू, हरभरा, द्राक्ष या पिकांवर त्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे गव्हाच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
एकीकडे अवकाळी पाऊस, गारपीट दुसरीकडे लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद होत्या. अश्या परिस्थितीमध्ये सुद्धा गव्हाच्या किंमतीमध्ये प्रति क्विंटल 100 रुपये दराने वाढ झाली. गव्हाच्या नुकसानीमुळे, आयात कमी होईल त्याचा परिणाम गव्हाच्या किंमतीवर पाहायला मिळेल असे वर्तवण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात ४२७ लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २४.४३ टक्के उत्पादन वाढून ९६.२१ लाख टन धान उत्पादन होईल, असा अंदाज केंद्र सरकारने वर्तवला आहे.
तसेच हरभरा पिकावर देखील अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे येत्या काही काळात हरभराच्या किंमतीवर त्याचा परिणाम पाहिला मिळेल. हरभऱ्याचे उत्पादन यंदा चांगले झाले असल्यामुळे त्याच्या भावामध्ये घट होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.