ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
यशोगाथा

20 एकरांवर आवळ्याच्या शेती, मिळाला स्थानिक बाजारपेठेत 25 ते 30 रुपये प्रति किलो दर…

भारतातील अनेक युवकांचा कल आधुनिक शेतीकडे जाताना दिसतोय. पारंपरिक शेतीला वगळून आधुनिक शेती करण्यासाठी अनेक शेतकरी उत्सुकलेले आहेत. असाच काही युवकांचा संघ आधुनिक शेती करून खूप चांगल्या प्रकारचे उत्पन्न निर्माण करत आहे. दहा वर्षांपूर्वी न्यू बोराडी येथील युवक शेतकरी प्रेमसिंह पावरा, प्रताप पावरा, कुवरसिंग पावरा, विजय पावरा, कमलसिंग पावरा, नाना पावरा, सुदाम पावरा, पूजा पावरा, संतोष पावरा एकत्र आले आणि त्यांचा नवीन संघ तयार केला. या युवक संघाचा कोल्हा आधुनिक शेतीकडे होता आणि यांनी आवळ्याची आधुनिक शेती करण्यास सुरुवात केली.

सलग चार वर्षापासून यांना त्या शेतीमधून उत्तम उत्पादन होत असल्याचे कळले. सातपुड्याच्या कुशीत न्यू बोराडी येथे आधुनिक आवळ्याची संक्रमित शेती करण्यात आले. बाजारपेठेत आवळ्याला मोठी मागणी पाहता उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन करण्याचे समाधान झाले. प्रत्येक आधुनिक शेतकऱ्याला मार्गदर्शनाची गरज असते आणि या संघाला शासनाच्या स्वयंसेवी संस्थेतर्फे मार्गदर्शन मिळाले ज्यामुळे हा युवक संघ उत्तम पीक पिकू शकला.

आवळ्याची शेती का?

या संघाने जमिनीची मातीची तपासणी केली आणि थोड पिकातून आवळा या पिकाची निवड केली. महाराष्ट्र विकास मंडळ व कृषी विभागातर्फे या शेतकऱ्यांनी कृषी दौरा केला ज्यात पुणतांबा जिल्हा नगर येथील आवडीची शेती पाहून त्यांनी संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला.

कशी केली लागवड?

बायफ मित्रा संस्थेच्या सहकाऱ्यांनी 20 एकरांवर आवळ्याच्या शेतीची लागवण करण्यात आली या संघाला कृषी अधिकाऱ्यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले व दहा बाय दहा मीटर अंतरावर रोपे लावायला सांगितली. या संघाने कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करीत ही प्रक्रिया पाळली. पहिल्या वर्षी एका झाडाला पाच किलो ,दुसऱ्या वर्षी दहा किलो ,तिसऱ्या वर्षी 40 किलो, चौथ्या वर्षी 80 किलो व त्यानंतर 100 ते 120 किलो आवळा मिळू लागला. 65 ते 70 ग्रॅम वजनाचा एक आवळा असून स्थानिक बाजारपेठेत 25 ते 30 रुपये प्रति किलो दर मिळतो. यामुळे त्यांना आवळ्याची शेती केल्यापासून भरभरीत उत्पन्न झाली व सध्या ते याच वरून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

सेंद्रिय खताचा वापर आणि उत्पादन मध्ये वाढ…

आवळ्याच्या झाडांना पाणी कमी लागतं त्यामुळे उन्हाळ्यात पाणी न देताही ते झाड जगत.खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मोरचुद चुना याचे द्रावण करून ते एक दिवस भिजवून झाडाच्या बुंध्यापाशी पाच फूट अंतरापर्यंत लावल्यास प्रभावी परिणाम मिळतो त्यामुळे उत्पादन कमी होण्याची भीती नाहीशी होते. सेंद्रिय खताचा वापर आंतर पीक घेतल्यामुळे अतिरिक्त खर्चसुद्धा कमी होतो. रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर टाळून केवळ नैसर्गिक पद्धतीचे खत आपण त्या झाडांसाठी वाढू शकतो जेणेकरून त्या झाडाची प्रतिकारशक्ती वाढवता येईल.

कडुलिंब अर्क गोमूत्र फवारणी निंबोळी अर्क यांचा वापर करून आपण या झाडांची प्रतिकार शक्ती वाढवू शकतो. नैसर्गिक खताचा वापर केल्यामुळे या पद्धतीच्या झाडे जगण्याला खर्च हा कमी येतो.आवळ्याची लागवड हलक्‍या व मध्यम जमिनीत केली जाते त्यामुळे आपल्याला या पिकामध्ये आंतरपीक म्हणून चवळी ,उडीद, मूग ,वाटणा ,हरभरा आदी पिके घेता येतात त्यामुळे उत्पादन वाढ वाढते आणि आर्थिक मदतही होते.

WEB TITLE: Amla cultivation on 20 acres, got 25 to 30 rupees per kg in the local market…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button