To Increase Soybean Crop | अमीर खानने घेतली दादाजी भुसे यांची भेट, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी आखला हा मोठा प्लॅन..
To Increase Soybean Crop | अभिनेता अमीर खान यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. अमीर खान हे राज्यातील सोयाबीन पिकांची वाढ करण्यासाठी पुढे आले आहेत. यांनी या अगोदरही पाणी फाऊंडेशनच्या (water foundation) माध्यमातून राज्यात पाणी बचतीसाठी चळवळ उभी करून राज्यात सर्व ठिकाणी पाणी पोहचवून पाणी जिरविण्याचं देखील काम केलं होतं. आता सोयाबीन उत्पन्न वाढविण्यासाठी पुढे आले आहेत.
सोयाबीन शेती शेतकऱ्यांनी कशी केली पाहिजे? उत्पादन कसे वाढवले पाहिजे? यासाठी सोयाबीन (soyabean) ऑनलाईन शेती शाळा देखील भरविली होती. आता सोयाबीन पीक कसे वाढवता येईल साठी अमीर खान यांनी पुढाकार घेतला आहे. फाउंडेशनच्या (foundation) तज्ज्ञांनी सोयाबीन (soyabean) शेती कशी करावी? यासाठी ऑनलाईन पुस्तिका तयार केली आहे.
वाचा – भारतातील मान्सून यावर्षी राहणार सामान्य; फक्त 907 मिलीमीटवर पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
कृषी मंत्री यांची भेट घेत अमीर खान यांनी पुस्तिकाचे अनावरणही केले या ऑनलाईन पुस्तिकाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. बरेच शेतकरी 15 – 20 क्विंटल प्रति एकर उत्पादन घेत आहेत. थोड्या वेगळ्या पद्धतीने पिके घेतल्यामुळे हे शक्य झाले आहे. ही पध्दत डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत (farmers) पोहचविल्यामुळे हे शक्य झाले असल्याचे अमीर खान यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा –