कृषी सल्ला
ट्रेंडिंग

‘ॲमेझॉन रिटेल’ ने शेतकऱ्यांसाठी “ही” सेवा सुरू केली; मार्गदर्शन तज्ञ शेतीविषयक मार्गदर्शन करण्यासाठी थेट शेतात..

‘Amazon Retail’ launches “this” service for farmers; Guidance experts go directly to the field to provide agricultural guidance.

कृषी विज्ञान सेवा (Agricultural Science Service) म्हणजेच अग्रोनोमी सर्विसेस (Agronomy Services) सुरू करण्याची ॲमेझॉन रिटेल ने घोषणा केली. या सेवेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकाविषयी योग्य सल्ला तसेच केली जाणारी शेतीची योग्य माहिती या कामाबद्दल वेळीच सुचना केली जाते. अग्रोनोमी सर्विस (Agronomy Services) दर्जेदार उत्पादनासाठी मशीन लर्निंग टेक्नॉलॉजी सादर करत आहे. व मजबूत सप्लाय चेन इन्फ्रास्ट्रक्चर ची निर्मिती करणार आहे. या विषयी सविस्तर माहिती पाहूया…

ॲमेझॉन इंडीया (Amazon India) चे डायरेक्टर समीर खेत्रपाल –

शेतकऱ्यांना माती आणि हवामान यांच्या स्थितीनुसार वैज्ञानिक पिक योजनेच्या उपयोग करून पुढे कसे नेता येईल याचा विचार चालू आहे. तसेच शेतकऱ्यांना उत्पन्न आणि फळ,भाजीपाला यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी व वाढवणाऱ्या उत्पादनासाठी लागणाऱ्या अत्युच्च टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सशक्त बनवणार आहोत. अशी माहिती ॲमेझॉन इंडीया (Amazon India) चे डायरेक्टर यांनी दिली.

वाचा: पुढच्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसान भरपाई वाटप; कृषी मंत्र्यांचा “या” जिल्ह्यासाठी निर्णय..

अग्रोनोमी सर्व्हिसेस फायदे –

अग्रोनोमी सर्विसेस (Agronomy Services) द्वारे ॲमेझॉन रिटेलने कृषी वैज्ञानिक हस्तक्षेपच्या प्रभावी फार्म मॅनेजमेंट टूल्सद्वारे इकोसिस्टम तयार केलेली आहे. या ठिकाणी नोंदणीकृत शेतकऱ्यांना वेळेत हस्तक्षेप देईल. कृषी उत्पन्न व उत्पादक (Agricultural income and productivity) नोंदणीकृत शेतकऱ्यांना एक एग्रीटेक सल्ला माहिती दिली जाईल.

मशीनचा उपयोग –

शेतकऱ्यांना फळे भाजीपाला मध्ये डाग असतील तर यांची मदत होते. यामुळे ग्राहकांना देखील दर्जेदार फळे उपलब्ध होतात. या सल्यांमुळे शेतकरी चांगले पिके फळे घेऊ शकतील व उत्पादन खराब होण्यापासून वाचते. म्हणून कमाईमध्ये वाढ होते.

वाचा: SBI ग्राहक आता कर्ज रक्कम सहज मिळवू शकतील; तपासा आपली कर्ज मर्यादा आणि अटी..

Amazon

सर्व्हिसेस बद्दल विशेष माहिती-

महाराष्ट्रातील मांजरा वाडी येथील शेतकरी अग्रोनोमी सर्विसेसचा वापर करत आहेत व त्यांनी सांगितले आहे की मी ॲमेझॉन च्या अग्रोनोमी सर्विसेस मध्ये फुलकोबी साठी रजिस्टर आहे. आणि मार्गदर्शनासाठी नियमितपणे तज्ञ आमच्या शेतात येत असतात. यामुळे हे नवनवीन प्लॅन्स बनवून शेती करतात. व योग्य मार्गदर्शनामुळे उत्पादनामध्ये दुप्पट फरक जाणवतो. त्यांनी ही ही सांगितले आहे की त्यांना या ॲपच्या मदतीने एक विकसित प्लान मिळाला आहे ज्या माध्यमातून ते शेतात काही पिकांना नकोशा गोष्टी दिसल्या तर त्या बाबतीत ते अलर्ट पाठवू शकतात. व आपण सावध राहतो. शेतकऱ्यांनी या सर्व्हिसेस चा व अँपचा अशाप्रकारे फायदा घेतला पाहिजे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा:

केंद्र सरकारने भरपूर सबसिडी मिळणाऱ्या “या” ‘4 कृषी यंत्र योजना’ सुरू केल्या; पहा कोणत्या आहेत योजना?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button