Pushpa 2 | मनोरंजन जगतात खळबळ! ‘पुष्पा 2′ प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक
Pushpa 2 | तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन यांना ‘पुष्पा 2‘ (Pushpa 2 ) चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी घडलेल्या एका दुर्घटनेच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही घटना हैदराबादमधील एका सिनेमागृहात घडली होती.
नेमक घडलं काय?
‘पुष्पा 2’ या चित्रपटाचे प्रीमियर झाल्यावर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी जमली होती. या गर्दीत अचानक चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी झाले होते. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी काय कारवाई केली?
या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की, चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी सुरक्षा व्यवस्था पुरेशी नव्हती. याच कारणामुळे ही चेंगराचेंगरी झाली.
वाचा: मिथुन आणि कन्या राशीचे लोक राहणार व्यस्त, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ
पोलिसांनी या प्रकरणी अल्लू अर्जुनसह चित्रपटाच्या निर्मात्यांवर आणि सिनेमागृहाच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अल्लू अर्जुनने काय सांगितले?
अल्लू अर्जुन यांनी या प्रकरणी आपल्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. त्याने सांगितले की, त्यांनी या घटनेची कल्पनाही केली नव्हती आणि या घटनेबद्दल तो खूप दुःखी आहेत. या प्रकरणामुळे चित्रपटसृष्टीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणामुळे चित्रपट निर्मात्यांना आणि सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाला सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
हेही वाचा:
• सोयाबीनचे दर नरमले! पण कापसाच्या दराचं काय? जाणून घ्या शेतमालाचे ताजे बाजारभाव