“या” जिल्ह्यातील शेळी, गाई-म्हैस सह या गटासाठी वाटप योजना अर्ज सुरू; असा करा अर्ज, “हे” आहेत लाभार्थी..
Allocation scheme application for this group with goats, cows and buffaloes in "this" district; Apply, "These" are the beneficiaries.
शेतकर्यांसाठी महत्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांसाठी शेळी गटांचे वाटप, गाई म्हैस वाटप, कुकुट पक्षी वाटप या योजनांच्या संदर्भातील महत्वाची माहिती आलेली आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या सर्व योजनांसाठी अर्ज मावण्यात आलेले आहेत. हा अर्ज कसा करायचा तसेच अर्जाचा नमुना कसा आहे? कोण लाभार्थी पात्र असणार आहेत? तसेच कोणकोणत्या योजनांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत? याच्या अंतर्गत किती अनुदान दिले जाणार आहे? हि सर्व माहिती आपण पाहणार आहोत.
१) १० शेळ्या १ बोकड गटाचे वाटप करण्यासाठी अर्ज –
सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी १० शेळ्या आणि एक बोकड अशा ४४ शेळी गटाचे उद्दिष्ट या योजनेच्या अंतर्गत ठेवण्यात आले आहे. यामध्ये गटाची एकूण किंमत १ लाख ३ हजार ५४५ रुपये असून यासाठी ७७ हजार ६५९ रुपये अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये ३ वर्षाच्या विम्याचा समावेश असणार असून शेळी गटाची खरेदी प्राधान्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महारष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्याकडून करण्यात येईल.
२) दुभत्या जनावरांच्या गटाचा पुरवठा करणेसाठी अर्ज मागणी –
सन २०२१-२२ या वर्षासाठी उस्मानाबाद जिल्ह्यास एकूण ५६ गाय/म्हैस गटाचे उदिष्ट असून गाय/म्हैस गटाची एकूण प्रकल्प किमत रुपये ८५,०६१ च्या ७५ टक्के शासन अनुदान रुपये ६३,७९६ अनुद्येय राहील. यामध्ये तीन वर्षाच्या विम्याचा समावेश आहे.
३) शेळ्यांचे गट वाटप करण्यासाठी अर्ज मागणी-
२०२१-२२ या वर्षासाठी एकूण १८ शेळी गटाचे उदिष्ट असून उस्मानाबाद जिल्ह्यात सदर योजनेंतर्गत एकून प्रकल्प किमत रुपये ७१ हजार २३९ रुपये असून ७५ टक्के अनुदान ५३ हजार ४२९ रुपये अनुद्येय राहील. यामध्ये शेळी गटाचा तीन वर्षाच्या विम्याचा समावेश आहे.
४) २ दुधाळ जनावरांचा गट वाटप करणेसाठी अर्ज मागणी –
सन २०२०-२१ या वर्षासाठी एकूण १५ गाय उदिष्ट असून प्रकल्प किमत रुपये ८५ हजार ६१ रुपये असून ७५ टक्के अनुदान म्हणजेच ६३ हजार ७९६ रुपये अनुद्येय राहील. यामध्ये तीन वर्षाच्या विम्याचा समावेश आहे.
५) अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांना १०० एकदिवसीय सुधारित कुकुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप अर्ज मागणी –
एकात्मिक कुकुट विकास कार्यक्रम अंतर्गत ५० टक्के अनुदानावर १०० एक दिवसीय सुधारित कुकुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करण्यासाठी सन २०२०-२०२१ आर्थिक वर्षाकरिता एकूण १२५ गटाचे उदिष्ट असून प्रकल्प किमत रुपये १६ हजार आहे. ५० टक्के शासकीय अनुदान म्हणजेच ८ हजार अनुद्येय राहील. यामध्ये २ हजार रुपयांची पिल्ले व ६ हजार चे खाद्याचा समावेश आहे. उर्वरित ५० टक्के लाभार्थी हिसा रुपये ८ हजार मधून लाभार्थ्याने पक्षांचा निवारा,खाद्याची भांडे, पाण्याची भांडी, औषधे यावर खर्च करायचा आहे.
६) दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम –
या योजनेंतर्गत १०० टक्के अनुदानावर दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्दतेसाठी सुधारणा कार्यक्रम अंतर्गत वैरण बियाणे वाटप करण्यासाठी २०२१-२२ या वर्षासाठी एकूण ८७५ लाभार्थ्यांचे उदिष्ट असून यामध्ये रुपये १५०० मर्यादेत सुधारित वैरण बियाणे/ठोंबे वाटप करण्यात येतील.
लाभार्थी –
१) दारिद्र रेषेखालील
२) अत्याल्प भूधारक
३) अल्प भूधारक
४) सुशिक्षित बेरोजगार
५) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र १ ते ४ मधील) या प्राधान्य क्रमानुसार राहील.
महिलांना ३० टक्के व दिव्यांगासाठी ५ टक्के आरक्षण राहील. लाभार्थी निवड समिती, शेळी गट खरेदी समिती शासन नियमानुसार खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –