महाराष्ट्रमध्ये कडक लॉकडाऊनची शक्यता सर्वपक्षीय बैठक! आज काय निर्णय घेणार बैठकीत!
All-party meeting on possibility of strict lockdown in Maharashtra! What will be decided in the meeting today!
महाराष्ट्रात कोरोणाचा मोठा प्रकोप झालेला पाहायला मिळत आहे, राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या चांगलीच वाढ झालेली आहे. आज पासून संचारबंदी आणि वीकएन्ड लॉक डाऊन सुरू झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ठाकरे सरकार कडक लॉकडाऊन चा विचार करत आहे.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाउनच्या आवश्यकता असल्याने याबाबत विरोधी पक्षाची काय भूमिका आहे त्यांचे मत जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,राज ठाकरे,चंद्रकांत पाटील अशा नेत्यांचा समावेश होणार आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कडक लॉक डाऊन चे संकेत दिले आहेत. तसेच आता रेल्वे सेवादेखील बंद होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
आज लॉकडाउन करणेबाबत महत्त्वपूर्ण बैठक असून दहावी व बारावीचे निर्णय येत्या पाच दिवसात घेतला जाईल, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे या काळात परीक्षेचे आयोजन करणे योग्य वाटत नसल्याची प्रतिक्रिया अनेक स्तरातून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.