अकोला: सोयाबीन विक्रेत्यांची काढली नवीन युक्ती, या युक्तीमुळे होणार का शेतकऱ्यांचे हाल? वाचा सविस्तर बातमी
Akola: Soybean sellers come up with new tactics, will this tactic affect farmers? Read detailed news
गेल्या वर्षी सोयाबीन (Soybeans) बियाणे बाबत बऱ्याच तक्रारी समोर आल्या, उगवण क्षमता नसलेली बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले होते, त्यामुळे अनेक कंपन्यांवर कायदेशीर कारवाई झाली होती, यावर्षी मात्र विक्रेते व कंपनी यांनी पळवाट काढत बियाण्यांची विक्री करताना कोणतीही जबाबदारी घेण्याचे टाळले. त्याकरता त्यांनी एक नवीन युक्ती साधली बियाणे विक्रीच्या देयकावरच शिक्का मारून जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सोयाबीनचे बियाण्यांची विक्री करताना, विक्रेती कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेण्यास तयार नाही त्याकरता त्यांनी सदर, “सोयाबीन बियाणे मी झाल्या जबाबदारीवर घेत आहे, तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईल’, असा शिक्का मारून बियाण्यांची विक्री केली जात आहे.
हे बियाणे उगवलेच नाही तरी याला जबाबदार कोण राहणार? म्हणजे अर्थातच यामध्ये शेतकरी (Farmers) फसला जात आहे. परंतु बियाणे विक्री कंपनीसह विक्रेता येथून आपोआप सुटत आहे अशा परिस्थितीत कंपनी व विक्रेते यावर आळा कसा बसणार हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
सल्ला तज्ञांचा: जाणून घ्या, जनावरांच्या आहारामध्ये कोणत्या घटकांचा समावेश असावा…
मागील वर्षी मोठया प्रमाणावर सोयाबीनचे बियाण्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झाली होती यावर प्रशासनाने कारवाईदेखील केली होती मात्र यावर्षी बियाणे खरेदी करताना अशा अटी घातल्या जात आहेत त्यामुळे जास्त खर्च करून घेतलेल्या बियाण्या मध्ये फसवणूक तर होणार नाही ना असा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनात उपस्थित झाला आहे.
यावर कृषी अधिकारी मिलिंद वानखडे बियाणे हा विषय कायद्याच्या अंतर्गत असून, असे शेतकऱ्यांना बांधून घेता येणार नाही, तसेच असे लिहून घेतल्यावर सुध्दा बियाण्यात दोष (Seed defects) आढळल्यास दुकानदार व कंपनीविरुद्ध कारवाई होऊ शकेल असे म्हंटले आहे.
हेही वाचा :
1)मान्सून आला जवळ! सोयाबीनची पिकाची अशी करा पेरणी…
2)शेतकऱ्यांसाठी खूषखबर! “महाबीज” च्या सोयाबीन बियाणे “या” किमतीला; पहा काय दर आहे बियाण्यांचा…