ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Agritourism | कास धरूया कृषिपर्यटनाची अन् सुकर करूयात वाट आनंददायी अर्थार्जनाची !

Let's take a look at the agricultural tourism and make it easier to wait for a pleasant income!

Agritourism | आपल्या मध्ये एक पद्धत आहे पोटासाठी गाव सोडून शहरात धावायचं. हाताला काम मिळाले की जरा स्थिरस्थावर व्हायचं. पोटाची भूक भागली की मनाला जाणीव होते आणि मग पुन्हा भूतकाळात मागे जातो. ती बांधावरची मजा, मोटचं पाणी, झाडाखालची न्याहारी, बैलगाडीतून मारलेली शिवारफेरी. (Agritourism ) ग्रामीण जगण्याची माहिती आणि अनुभव असलेल्यांना गावाकडच्या आठवणी साद घालतात तर शहरात वाढलेल्या मुलांना तरुणांना याचा गंधसुद्धा नसतो पण त्यांना रोजच्या कंटाळवाण्या जगण्यात change हवा असतो. या सगळ्यामधून एक झक्कास व्यवसाय उभारता येतो. तो म्हणजे कृषी पर्यटनाचा.


कृषी पर्यटन हा पर्यटनाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये ग्रामीण जीवनाचा अनुभव घेण्याच्या आणि कृषी पद्धतींमध्ये अंतर्दृष्टी मिळविण्याच्या उद्देशाने शेत आणि द्राक्षबागा यासारख्या कृषी क्षेत्रांना भेट देणे समाविष्ट आहे. भारतात ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न देण्याचा मार्ग म्हणून कृषी पर्यटन लोकप्रिय होत आहे.
महाराष्ट्रात मोराची चिंचोली इथे तर वर्षभर हा व्यवसाय चालतो पावसाळ्यात ‘मान्सून शिबिर’ यात शहरी लोकांना शक्यतो weekend ला दोन दिवस निवासी शिबिर भरवून भातलागवड, रानभाज्यांची पंगत असे नाविन्यपूर्ण अनुभव दिले जातात . तर हिवाळ्यात हुरडा पार्टी साजरी केली जाते. उन्हाळ्यांमध्ये सुट्ट्यांमुळे Advance booking करावे लागते. इतका हा व्यवसाय तुफान चालतो. हा व्यवसाय भरभराटीला आणण्यासाठी योग्य नियोजन, अचूक Marketing आणि भन्नाट कल्पना याची गरज आहे.

वाचा : ‘या’ निर्णयाने कृषीउद्योग आणि पर्यटनाला मिळणार चालना ; कृषी पर्यटन धोरणात झाली ‘मोठी’ सुधारणा..


राज्यात कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. कृषी पर्यटन केंद्रांच्या उभारणीसाठी शेतकरी व उद्योजकांना आर्थिक मदत करून महाराष्ट्रातील कृषी पर्यटनाला चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत सरकार प्रकल्प खर्चाच्या ५० टक्क्यांपर्यंत, जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत अनुदान देते. होमस्टे योजना : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात होमस्टेला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत सरकार व्यक्ती आणि कुटुंबांना होमस्टे उभारण्यासाठी आर्थिक मदत करते. दिले जाणारे अनुदान प्रकल्प खर्चाच्या 33% पर्यंत आहे, जास्तीत जास्त 3 लाख रुपयांच्या अधीन आहे.


कृषी पर्यटन केवळ अभ्यागतांसाठी एक अनोखा प्रवास अनुभव प्रदान करत नाही, तर शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्यास आणि स्थानिक शेतकऱ्यांना समर्थन देण्यास देखील मदत करते.

  • ऋतुजा चौगले
    एम.एस्सी. (मृदा विज्ञान)

हेही वाचा :

Web Title : Let’s take a look at the agricultural tourism and make it easier to wait for a pleasant income!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button