कृषी सल्ला

शेतकऱ्यांसाठी ‘शेतकरी उत्पादक कंपनी’ने आयोजित केली कार्यशाळा; शेतमाल, बाजारपेठ, कर्जासह योजनांची मिळणार माहिती

Agriculture Workshop | शेतकरी बांधवांना शेती करताना जर प्रशिक्षण मिळाले तर शेतकऱ्यांना नक्कीच यशस्वी होण्याचे मार्ग खुले होतील. शेतकऱ्यांना शेती करणे सोपे करण्यासाठी तसेच योग्य सल्ला मिळावा म्हणूनच आम्ही त्यांच्यासाठी एक प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन आलो आहोत. मराठा क्रांती योजनेंतर्गत महाएफपीओ फेडरेशन आयोजित ‘शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा’ घेण्यात येणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या कार्यशाळेमुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठ, कर्ज विविध योजना यांची सखोल माहिती मिळणार आहे.

शेतकऱ्यांना काय होणारं फायदा?
शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) ही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन करण्यात आलेली कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे सोयीचे होणार आहे. तर या कार्यशाळेत एफपीसी स्थापनेची संपूर्ण प्रक्रिया, आरओसी कम्पलायेन्स, ऑडीट इत्यादी विषयांवर माहिती देण्यात येणारं आहे. व्यवसाय निवड, बिझिनेस प्लॅन तयार करणे, मार्केट लिंकेज, डिजीटल मार्केटिंग, करार शेती, निर्यात या विषयांवर योग्य मार्गदर्शन शेतकरी बांधवांना दिले जाणार आहे. कर्ज प्रकरणे, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे, कृषी सेवा केंद्र, शेतीशाळा उभारणे इत्यादी विषयांवरही माहिती दिली जाईल. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

कार्यशाळेचे विषय काय आहेत?

  • एफपीसी स्थापना, आरओसी कम्पलायेन्स, ऑडीट.
  • व्यवसाय निवड, बिझिनेस प्लॅन्, मार्केट लिंकेज, डिजीटल मार्केटिंग करार शेती, निर्यात
  • कर्ज प्रकरणे, प्रोजेक्ट रिपोर्ट, कृषी सेवा केंद्र, शेतीशाळा
  • राज्य सरकारी योजना- स्मार्ट, पीएमएफएमइ, मॅग्नेट, प्रक्रिया उद्योग, सबसिडी
  • केंद्र सरकारी योजना- एसएफएससी, 10000 एफपीओ
  • नाफेड खरेदी योजना, कांदा, सोयाबीन, तूर, हरभरा, उडीद खरेदी केंद्रे.

कार्यशाळेचे वेळ आणि ठिकाण
मराठा क्रांती योजना
महाएफपीओ फेडरेशन आयोजित
शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा
दिनांकः १ ऑक्टोबर २०२३ रविवार
वेळ: सकाळी ११:३० ते संध्या. ६
स्थळ:पोलीस संशोधन केंद्र, पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय समोर, पाषाण, पुणे

नोंदणी आवश्यक

https://forms.gle/Q5Qa3j3ZVqxBZXMKA या लिंकवर जाऊन माहिती भरावा लागेल..

संपर्क: डॉ. संजय पांढरे
व्यवस्थापकीय संचालक
महाएफपीओ फेडरेशन
9309048498, 9730677319 आणि 8530207159

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Information about agricultural production, market, loans and schemes will be available at one place! A workshop was organized for the farmers by the ‘Shetkari Producer Company’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button