योजना

Agriculture Scheme | केंद्र सरकार शेतकऱ्यांना ‘या’ योजनेतंर्गत वर्षाला देतय 42 हजार; पिक नुकसानीसाठीही मिळते भरपाई

42 thousand annually to the farmers under this scheme; Compensation is also available for crop damage

Agriculture Scheme | शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांद्वारे शेतकऱ्यांना (Agriculture Scheme) अनेक प्रकारची मदत मिळते. कोणकोणत्या योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत करतात आणि शेतीशी संबंधित इतर कामातही मदत करतात ते जाणून घेऊया.

पीएम किसान सन्मान निधी योजना
पीएम किसान सन्मान निधी
योजनेंतर्गत शेतकरी बांधवांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. या योजनेंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांना चार हप्त्यात पाठवले जातात. म्हणजेच ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिली जाते. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करताना कोणतीही चूक करू नका. योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी शेतकरी बांधव पीएम किसान योजना हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

वाचा : PM Kisan | शेतकऱ्यांनो केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेऊन मिळवा आर्थिक फायदा; लाभासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

पीएम किसान मानधन योजना
पीएम किसान मानधन योजनेंतर्गत सरकार दर महिन्याला शेतकऱ्यांना 3,000 रुपये पेन्शन देत आहे. या योजनेसाठी केवळ 18 ते 40 वयोगटातील शेतकरीच अर्ज करण्यास पात्र आहेत. जेव्हा शेतकरी वयाची 60 वर्षे पूर्ण करतात तेव्हा त्यांच्या खात्यावर दरमहा 3,000 रुपये पेन्शन पाठवले जाते.

पंतप्रधान पीक विमा योजना
प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोग यांमुळे पिकाच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण दिले जाते. या योजनेंतर्गत शेतकरी बांधवांना विमा हप्ता भरावा लागणार होता. ज्यावर सरकार अनुदान देते. केंद्र आणि राज्य सरकारे 50:50 च्या प्रमाणात विनाअनुदानित पिकांसाठी प्रीमियम सबसिडी शेअर करतात. त्याच वेळी, केंद्र सरकार अनुदानित पिकांसाठी जास्त अनुदानाचा हिस्सा देते.

हेही वाचा :

Web Title: 42 thousand annually to the farmers under this scheme; Compensation is also available for crop damage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button