Agriculture Scheme | जुन्या विहिरी दुरुस्तीपसून ते बोअरवेल, नवीन विहितींसाठीही ‘या’ योजनेंतर्गत मिळतंय अनुदान; जाणून घ्या
From repair of old wells to bore wells, new prescriptions are also getting subsidy under this scheme; find out
Agriculture Scheme | महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदान देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विहीर बांधणे, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोरिंग, पंप संच, वीज जोडणी, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, सिंचन संच (तुषार सिंचन व ठिबक सिंचन) पी व्ही सी पाईप, परसबाग इत्यादी गोष्टींवर अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सातारा, सांगली, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व रत्नागिरी या जिल्हे वगळता राज्यातील बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये घेता येईल.
अनुदान रक्कम
- नवीन विहीर बांधण्यासाठी 2 लाख 50 हजार रुपये
- जुनी विहीर दुरुस्ती 50 हजार रुपये
- इनवेल बोरिंग साठी 20 हजार रुपये
- पंप संच साठी 20 हजार रुपये.
- वीज जोडणी साठी 10 हजार रुपये
- शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी 1 लाख रुपये
- ठिबक सिंचन 50 हजार किंवा तुषार सिंचन करिता 25 हजार रुपये.
- पी व्ही सी पाईप साठी 30 हजार रुपये
- परसबाग करिता 500 रुपये
वाचा : Yojana | कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत ‘या’ शेतकऱ्यांना मिळतंय विहीरीसाठी अनुदान, जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे व पात्रता
योजनेच्या लाभासाठी पात्रता:
- शेतकरी अनुसूचित जातीचा असावा.
- शेतकऱ्याच्या नावे जमिनीचा सातबारा 8अ उतारा असावा.
- शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपये असावे.
- शेतकऱ्याची जमीन धारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत असावी.
- दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
- अपंग किंवा महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य देण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित जिल्हा कृषी विभागाच्या कार्यालयात अर्ज करायचा आहे. https://agriwell.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज देखील करता येईल. या योजनेमुळे अनुसूचित जाती शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा मिळून त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
हेही वाचा :
- Government Loan Scheme | खिशात 1 रुपया नाही, पण बिझनेस सुरु करायचाय? जाणून घ्या लोन देणाऱ्या ‘या’ खास योजना
- Subsidy | शेतकऱ्यांच्या कामाची बातमी! वराह पालनासाठी ‘या’ योजनेतंर्गत मिळतंय अनुदान, जाणून घ्या कसा करावा अर्ज?
Web Title: From repair of old wells to bore wells, new prescriptions are also getting subsidy under this scheme; find out