ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Yojana | काय सांगता? ‘या’ योजनेंतर्गत मिळतेय शेत जमीन, जाणून घ्या पात्रता आणि अटी

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील भूमिहीन (Landless Farmers) शेतकऱ्यांना रोजगाराची (Employment Opportunity) संधी उपलब्ध व्हावी यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना (Karmaveer Dadasaheb Gaikwad Empowerment and Swabhiman Yojana) राबविण्यात येणार आहे.

Yojana | या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती (SC) व नवबौद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना 2 एकर बागायत किंवा 4 एकर जिराईत जमीन 100 टक्के अनुदान (Subsidy) स्वरूपात देण्यात येते. आज आपण कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना 2022 ची माहिती पाहणार आहोत.

किती मिळणार जमीन?
या योजनेअंतर्गत भूमिहीन शेतमजूर कुटूंबाला 4 एकर कोरडवाहू जमीन किंवा 2 एकर बागायती जमीन उपलब्ध करून त्याच्या नावे करून देण्यात येते. तसेच, जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज स्वरूपात तर ५० टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते. सदर योजना ही 2004-2005 पासून राबवण्यात येत आहे.

वाचा: Subsidy | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांची यादी जाहीर

योजनेच्या अटी
या योजनेसाठी लाभार्थी हा भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असावा. त्याचे वय 18 ते 60 वर्ष असावे. विधवा किंवा परित्यक्ता स्त्रीयांना योजनेतील लाभासाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे. कर्ज मंजुरी झाल्यानंतर दोन वर्षाने कर्जफेड सुरुवात होणार आहे. कुटुंबाने दिलेल्या कालावधीत कर्जफेड करणे आवश्यक आहे. लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्याबाबत विहीत प्रमाणपत्र असावे. शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्यांचा 100 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र असणे बंधनकारक आहे. तसेच, खरेदी जमिनीवर लाभार्थ्याने स्वतः लागवड करणे आवश्यक असून याबद्दलचा करारनामा देणे आवश्यक आहे. महसूल व वन विभागाने ज्या व्यक्तीस गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केल्या आहेत, अशा कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.

वाचा: PM Kisan Yojana | शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता मिळणार ‘या’ दिवशी

वरील सर्व अटी व पात्रता लाभ घेण्यास पात्र असल्यास संबंधित जिल्याच्या सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावा. तसेच, संबंधित योजना ही भूमिहीन शेतमजूरांसाठी हक्काची जमीन मिळावी म्हणून अमलात आणली गेली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button