
Agriculture News | राज्यातील जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना जाहीर केली आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत आंबा, चिकू, संत्रा आणि मोसंबी या फळपिकांच्या बागांसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 20 हजार रुपये अनुदान दिले जाईल.
राज्यात बऱ्याचशा जुन्या फळबागांमध्ये योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणं, नांग्या न भरणं, खते आणि औषधांचा योग्य वापर न करणं, झाडांना व्यवस्थित आकार न देणं, झाडांची गर्दी होणं आदी बाबींमुळे उत्पादकता कमी होत आहे. या योजनेमुळे या समस्या दूर होऊन फळबागांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल.
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
वाचा : Yojana | शेतकऱ्यांनो ‘या’ योजनेंतर्गत नव्या आणि जुन्या विहिरींसाठी मिळतंय अनुदान, पात्रता जाणून त्वरित करा अर्ज
योजनेची वैशिष्ट्ये
योजनेअंतर्गत, आंबा, चिकू, संत्रा आणि मोसंबी या फळपिकांच्या बागांसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 20 हजार रुपये अनुदान दिले जाईल.
अनुदानाची रक्कम प्रकल्प खर्चाच्या 50% आहे.
अर्जदार शेतकऱ्यांनी बागेचे क्षेत्र कमीत कमी 0.20 हेक्टर आणि कमाल 2 हेक्टर असावे.
बागेची वय कमीत कमी 20 वर्षे असावे.
योजनेचा लाभ
या योजनेमुळे जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन होईल.
फळबागांचे उत्पादन वाढेल.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
फळबागांची उत्पादकता वाढून राज्यातील फळ उत्पादनात वाढ होईल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- Hydrogen Bus | पेट्रोल डिझेलची चिंताच मिटली! भारताची पहिली हायड्रोजन बस होतेय सुरू; जाणून घ्या कशावर चालणार?
- Financial Deadline | सप्टेंबर महिना संपण्यापूर्वीच ‘ही’ महत्त्वाची करा आर्थिक कामे; अन्यथा तुम्हाला मोठ्या अडचणींना जावं लागेल सामोरं
Web Title: Now farmers will get help under this scheme for revival of old orchards; Know in detail