हवामानाचा अंदाज घेऊन पेरणी करावी – कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे शेतकऱ्यांना आवाहन!
Agriculture Minister Dadaji Bhuse appeals to farmers to sow according to weather forecast!
वेळेआधीच महाराष्ट्र (Maharashtra) मध्ये मान्सून ने हजेरी लावली असल्याने राज्यभर पेरणीची (Of sowing) लगबग चालू झाली आहे, राज्यामध्ये एकूण 27 टक्के पेरणी पूर्ण झाली असून, हवामानाचा अंदाज (Weather forecast) घेऊन पेरणी करावी असे आवाहन कृषी मंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी शेतकऱ्यांना केले.
हवामानाच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यामध्ये मान्सूनचा (Of the monsoon) वेग कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जमिनीतील ओलावा लक्षात घेऊनच शेतकर्यांनी पेरणी बाबत योग्य निर्णय घ्यावा.Agriculture Minister Dadaji Bhuse appeal to farmers to start cultivation after sufficient rain)
22 जून पर्यंत राज्यामध्ये 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत, मागील वर्षी या तारखेपर्यंत 38 टक्के पेरण्या झाल्या होत्या, तरीही 80 ते 100 मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करण्यात घाई करू नये असे आवाहन दादाजी भुसे यांनी केले आहे.
हेही वाचा : तुमच्या आधार कार्डवर कोणी सिमकार्ड घेतलं आहे हे कसे कळेल? असे करा चेक…
हेही वाचा : फळपीक योजनेत सहभागी व्हा! कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन…
अनेक ठिकाणी पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यानं पेरण्या खोळंबल्या आहेत, तर राज्यामध्ये आठ दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून पावसानं दांडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा:
राज्यात सध्या काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून 22 जुन पर्यंत राज्यात सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत 38 टक्के पेरण्या झाल्या होत्या. शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये .@CMOMaharashtra @AUThackeray pic.twitter.com/0FUc6O6mgY
— Dadaji Bhuse (@dadajibhuse) June 24, 2021
हेही वाचा :
1. अबब! ‘या’ देशातील लोकांना केळी खाण्यासाठी मोजावे लागतात 3300 रुपये! वाचा सविस्तर बातमी
2. पेरणी करण्याची योग्य पद्धत कोणती तसेच पेरणी करताना कशी काळजी घ्याल; वाचा सविस्तरपणे…