ताज्या बातम्या

Agriculture | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यातील 40 दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना 8 सवलतीसह ‘इतकी’ आर्थिक मदत जाहीर

: Good news for farmers! 40 drought-affected talukas of the state announced 'so much' financial assistance with 8 concessions

Agriculture | राज्यातील पावसाळ्यात सरासरीपेक्षा 50 ते 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला. या पार्श्वभूमीवर 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या उपसमितीने 1021 महसूल मंडळातही दुष्काळ जाहीर केला. मात्र, वाढीव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना (Agriculture) केवळ सवलतीच मिळणार असून आर्थिक मदत परवडणारी नसल्याने त्या 40 तालुक्यातील शेतकऱ्यांनाच अर्थसहाय मिळेल, असे मदत व पुनवर्सन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

शेतकऱ्यांना मदत जाहीर
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने ‘एसडीआरएफ’अंतर्गत सात हजार कोटींची तरतूद केली आहे. या निधीतून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 8,500 रुपये (जिरायत), 17,000 रुपये (बागायती) आणि 22,500 रुपये (बहुवार्षिक) आर्थिक मदत दिली जाणार आहे. या मदतीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागतील.

वाचा : Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रक्कमचे वाटप सुरू; त्वरित तपासा तुमचा जिल्हा

शेतकऱ्यांना मिळणार आठ सवलती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, शेतकऱ्यांकडील पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती, कृषीपंपाच्या चालू विजबिलाबात 33.5 टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता, आवश्यक त्या गावांना पिण्याचे पाणी टँकरने पुरवणे, ‘महावितरण’ने शेतीपंपाची वीज जोडणी खंडीत करू नये, अशा आठ सवलतीही दिल्या जाणार आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने लवकरच प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा :

Web Title: Good news for farmers! 40 drought-affected talukas of the state announced ‘so much’ financial assistance with 8 concessions

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button