Agriculture Decision | केंद्र शासनाचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! शेतकऱ्यांना होणार लाखोंचा फायदा, लगेच पाहा
Agriculture Decision | केंद्र सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत देशाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांचा सर्वात जास्त फायदा शेतकरी, युवक आणि नवोद्योगांना होणार आहे. (Agriculture Decision)
नैसर्गिक शेतीला चालना
मंत्रिमंडळाने देशभरात नैसर्गिक शेतीला (Natural Farming) प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान सुरू करण्यात येणार आहे. या अभियानासाठी 2481 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे सुमारे एक कोटी शेतकरी या अभियानाचा लाभ घेऊ शकतील. नैसर्गिक शेतीमुळे (Agriculture) मातीची गुणवत्ता सुधारेल आणि रासायनिक खतांचा वापर कमी होईल. यामुळे उत्पादित होणारे अन्न अधिक निरोगी असेल.
युवकांसाठी वन नेशन वन सबस्क्रिप्शन
युवकांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी 6000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेतून युवकांना विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील.
नवोद्योगांना चालना
नवोद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन 2.0 ला मंजुरी देण्यात आली आहे. या मिशनसाठी 2750 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या मिशन अंतर्गत 30 नवीन इनोव्हेशन सेंटर्स उभारले जातील.
पॅन 2.0
पॅन कार्ड जारी करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी पॅन 2.0 ला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करणे आणि त्याची पडताळणी करणे सोपे होईल.
रेल्वे प्रकल्प
देशातील रेल्वे नेटवर्क मजबूत करण्यासाठी मंत्रिमंडळाने तीन महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांसाठी एकूण 7927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे देशातील वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि मालवहनाचा खर्च कमी होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या बैठकीत घेतलेले निर्णय देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. या निर्णयांचा सर्वात जास्त फायदा शेतकरी, युवक आणि नवोद्योगांना होणार आहे.
हेही वाचा:
• मेष, कर्क, कन्या आणि धनुसह ‘या’ राशींसाठी नवा आठवडा ठरणार फलदायी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य
• हरभरा दरात नरमाई ! पण शेतकऱ्यांनो सोयाबीनचे वाढले भाव, पाहा कापूस, कांद्याचे ताजे बाजारभाव..