इतर

कृषीदिन विशेष : आजचा आधुनिक शेतकरी…

Agriculture Day Special: Today's Modern Farmer

[metaslider id=4085 cssclass=””]

आज एक जुलै, आजच्या दिवशी “कृषी दिन” (Agriculture Day) राज्यामध्ये उत्साहाने साजरा करतात, कृषिक्रांतीचे अग्रदूत व पंचायतराजचे जनक वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांची जयंती एक जुलैला कृषिदिन म्हणून साजरी केली जावी म्हणून हा निर्णय राज्य सरकारने (State Government) गेला.

अलीकडच्या काळामध्ये शेतीमध्ये, तसेच शेती करण्याकरता अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, पूर्वीच्या काळी मात्र तसे नसे अजोड कष्ट, जिद्दीचा प्रवास करून देखील शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नसे, काही वेळेस नांगरणीला बैल नसल्यास कितीतरी शेतकरी स्वतः नांगर ओढत असत, परंतु भूमातेशी एकनिष्ठ राहून शेती करत असे शेती त्याकाळी परवडत नव्हती परंतु शेतीची सेवा ते निस्वार्थीपणाने करत असत.

पूर्वी आजोबांना माहीत असायचे, आपल्याला आंब्याच्या झाडाचे आंबे खायला मिळणार नाहीत, परंतु पुढच्या पिढीसाठी म्हणजेच आपल्या नातवंडांसाठी ती झाडे लावत असे. इतका दुरदृष्टीपणा त्याकाळी होता. त्याच बरोबर शेतामध्ये आलेले धान्य किंवा इतर शेतमाल त्यांनी निढळ हातांनी आपल्या नातेवाईकांमध्ये वानवळा म्हणून वाटलं असेल, पूर्वीच्या काळी उद्दत अंतकरण असलेला हा शेतकरी कधी रडत बसला नाही तर खंबीरपणे आलेल्या संकटाला सामोरे गेला.

हे ही वाचा :मोबाईल हरवला आहे का? करा ‘हे’ काम अन्यथा होईल मोठे नुकसान..

काळानुसार आता शेतीदेखील बदलत चालले आहे, मनुष्यबळाची (Of manpower) जागा तंत्रज्ञान घेत आहेत, शेतीमध्ये अनेक प्रयोग केले जातात, रासायनिक खतांचा उपयोग करून शेती पिकवली जाते. नवीन बियाणे तसेच वाणांमध्ये सातत्याने नवे संशोधन (New research) चालू असते. आता शेतकरी शेती ही व्यापारी दृष्टीकोणामधून पाहत आहे. दोन पिढ्याने मिळणाऱ्या आंबा आत्ता दोन वर्षाच्या आत मध्ये झाडाला आंबा लागत आहे. हे सर्व संशोधन तसेच नवीन तंत्रज्ञानाची कमाल आहे.

बरेच शेतकरी आयात-निर्यात (Import-export) करू लागले आहेत, साधे गायीच्या शेनापासून बनवलेल्या गौर्या देखील दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन पोहोचल्या, तसेच नाशिक मधील द्राक्ष, पुरंदर मधील अंजीर हे थेट विदेशात जाऊन पोचले. पूर्वी थंड हवेचे ठिकाणच स्ट्रॉबेरी, सफरचंद येत असत. परंतु या काळच्या शेतकऱ्यांनी ही व्याख्या बदलून आज स्टोबेरी सफरचंदाच्या बागा राज्यांमध्ये लावल्या आहेत.

जसे की, जळगावची केळी, रत्नागिरीचा हापूस यासारख्या फळांना पेटांन (Petan) मिळवले आहेत. आजचा शेतकरी आधुनिकतेकडे पाऊल टाकत, नवीन वाटचाल करत आहेत अशा सर्व कष्टाळू, मायाळू, जगाच्या अन्नदात्याला ” कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”. तसेच आजवर तुम्ही केलेल्या कार्याला आमच्याकडून सलाम!

हे ही वाचा :भरघोस उत्पादन देणाऱ्या लसुणाचे नव्या वाणाची झाली निर्मिती! मिळणार कमी दिवसात अधिक उत्पादन…

हे ही वाचा :
smart technique: कांद्याची साठवणूक कमी पैशांमध्ये व कमी जागेमध्ये कशी कराल? जाणून घ्या ; स्मार्ट टेक्निक!

LPG Subsidy: एलपीजी सब्सिडी बँक खात्यात जमा होते का? नाहीतर’ येथे’ करा तक्रार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button