Agricultural Fertilizer | आनंदाची बातमी! शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च होणार कमी अन् वाढणार आर्थिक उत्पन्न, खताचे भाव झाले कमी
Good news! Production cost of farmers will decrease and financial income will increase, fertilizer prices will decrease
Agricultural Fertilizer | केंद्र सरकारने रब्बी हंगामासाठी खतांवर अनुदान वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना खतांच्या (Agricultural Fertilizer) वाढत्या किमतीचा फटका बसणार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने रब्बी हंगाम २०२३-२४ साठी (१ ऑक्टोबर २०२३ ते ३१ मार्च २०२४) फॉस्फेटिक आणि पोटॅशिक (P&K) खतांवर पोषण आधारित अनुदान (एनबीएस) दर निश्चित करण्यासाठी खत विभागाने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. अनुदानात वाढ झाल्याने एका दृष्टीने खताचे दर कमी झाले आहेत. कारण शेतकऱ्यांना आता पूर्वीपेक्षा अधिक अनुदान मिळणार आहे.
प्रति किलो अनुदान दर (रु. मध्ये)
एन (नायट्रोजन) – ४७.०२
P(फॉस्फरस) – २०.८२
के(पोटाश) – ०२.३८
S(सल्फर) – १.८९
शेतकऱ्यांचे वाढणार उत्पन्न
आगामी रब्बी हंगामात एनबीएसवर सुमारे २२,३०३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या निर्णयाचे शेतकऱ्यांसाठी अनेक फायदे आहेत. यामुळे शेतकऱ्यांना खतांची उपलब्धता सुनिश्चित होईल आणि त्यांना परवडणाऱ्या किमतीत खत मिळतील. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांना होणार फायदे
शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खतांची उपलब्धता सुनिश्चित होईल.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांवर खतांच्या वाढत्या किमतींचा फटका बसणार नाही.
वाचा : Leadership Skills | मुलांमध्ये नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी पालकांसाठी मंत्र; जाणून घ्या काय ?
रब्बी हंगामासाठी एनबीएस दर वाढवण्याचा निर्णय
सरकार खत उत्पादक/आयातदारांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानित भावाला २५ श्रेणींमधील P&K खत उपलब्ध करून देत आहे. P&K खतांवरील अनुदान ०१.०४.२०१० पासून एनबीएस योजनेद्वारे नियंत्रित केले जाते. युरिया, डीएपी, एमओपी आणि सल्फर या खतांच्या आणि इतर कृषी मालाच्या आंतरराष्ट्रीय किमतींचा सध्याचा कल लक्षात घेता, सरकारने रब्बी हंगामासाठी एनबीएस दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :
Web Title: Good news! Production cost of farmers will decrease and financial income will increase, fertilizer prices will decrease