ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
Tech

Aether 450 Apex Launch | एथर ४५० ॲपेक्स लाँच, इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात क्रांती घडवणार?

Aether 450 Apex Launch | Aether 450 Apex launch, will revolutionize the field of electric vehicles?

Aether 450 Apex Launch | पुण्यातून एक धमाकेदार बातमी येत आहे! देशातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी एथर एनर्जीने आपल्या १० व्या वर्सहोत्सवाच्या निमित्ताने एक खास स्कूटर लाँच केली आहे. त्याचे नाव आहे (Aether 450 Apex Launch) ४५० ॲपेक्स. ही स्कूटर केवळ इंजिन आणि डिझाईनमुळेच नाही तर एकूणच इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात क्रांती घडवू शकते अशी क्षमता या स्कूटरमध्ये आहे.

या स्कूटरची सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे त्याची पारदर्शी बॉडी. होय, तुम्ही बरोबर वाचले! (Ather 450 Apex specifications) ही भारतातील पहिली अशी स्कूटर आहे ज्याची बॉडी पारदर्शी आहे. यामुळे स्कूटरचे इंजिन आणि इतर मेकॅनिकल पार्ट्स सहज दिसतात आणि त्यामुळे इंजिनियरिंगचे तंत्रज्ञान समजून घेणे सोपे होते. शिवाय, ही पारदर्शकता स्कूटरला एक वेगळे आणि आधुनिक रूप देते.

४५० ॲपेक्स केवळ दिसण्यातच सुंदर नाही तर चालविण्यासही अतिशय सोपी आहे. त्यात ग्राहकांना आवडतील अशा आकर्षक रंगसंगती आहेत. शिवाय, या स्कूटरमध्ये ‘मॅजिक ट्विस्ट’ नावाचे एक खास फीचर आहे. हे फीचर स्कूटर चालवणे खूपच सोपे बनवते. शहरातच्या गर्दीत सहज मॅन्यूव्हर करण्यासाठी हे फीचर खूप उपयुक्त आहे.

वाचा | शेतकरी मित्रांनो दिवाळीला घरी घेऊन या “ही” इलेक्ट्रीक स्कुटर; जी १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये धावते 15 KM….

पॉवर आणि स्पीडच्या बाबतीतही ४५० ॲपेक्स कोणत्याही पेट्रोल स्कूटरला टक्कर देऊ शकते. ही स्कूटर फक्त २.९ सेकंदात ० ते ४० किलोमीटर प्रति तास इतकी स्पीड पकडू शकते. इतकेच नाही तर या स्कूटरची बॅटरी (Ather 450 Apex range) क्षमताही चांगली आहे आणि ब्रेक सिस्टिमही अत्याधुनिक आहे.

एथर एनर्जीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण मेहता यांनी या स्कूटरबद्दल उत्साहाने सांगितले, “एथरला १० वर्षे पूर्ण होत असताना आम्हाला काहीतरी खास करायचे होते. त्यामुळे आम्ही ही ४५० ॲपेक्स स्कूटर तयार केली. ही आतापर्यंतची आमची सर्वोत्तम स्कूटर आहे आणि ती इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात एक नवीन दिशा दाखवते.”

या स्कूटरची किंमत १.५९ लाख रुपये आहे आणि सध्या ती पुणे, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता येथे उपलब्ध आहे. येत्या काळात भारतातील इतर शहरांमध्येही ती उपलब्ध होणार आहेत.

एथरची ही पारदर्शी सुपर स्कूटर निश्चितच इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात एक गेम चेंजर ठरेल अशी चिन्हे आहेत.

Web Title | Aether 450 Apex Launch | Aether 450 Apex launch, will revolutionize the field of electric vehicles?

येभी जानिये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button