भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department) कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन तो उत्तर व पश्चिम भागाकडे सरकू शकतो. तो पुढे येत्या १६ व १७ ऑक्टोबरला महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची काढणी (Harvesting of soybean crop) शक्य तितक्या लवकर करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
खरिपाच्या उभ्या पिकांना पुन्हा फटका बसू शकतो. सर्वात जास्त धोका सध्या सोयाबीनच्या (soybean) उभ्या पिकाला आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरच्या आत पिकाची कापणी करणे हा एक चांगला पर्याय आहे. वेळीच काढणी केल्यास या संकटापासून बचाव करता येईल. राज्यात यंदा कृषी विभागाच्या (Department of Agriculture) प्रयत्नामुळे सोयाबीनचा पेरा उच्चांकी पातळीवर झालेला आहे. मात्र निम्मा पेरा अवकाळी पावसामुळे अडचणीत आला आहे. यापुढेही पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उभ्या पिकाची काढणी १५ ऑक्टोबरपर्यंत करणे अत्यावश्यक आहे.
वाचा –
सोयाबिन काढणी प्रक्रिया –
जून महिन्यात पेरणी केलेले सोयाबीन आता काढणीला आलेले आहे. पेरणीनंतर काढणी ही 90 ते 100 हे पीक काढणी योग्य होते. पीक परिपक्व झाल्यास त्याची वेळेत काढणी महत्वाची आहे. अन्यथा शेंगा ह्या तडकल्या जातात. त्यामुळे उत्पादनात घट होते. सोयाबीनचे उत्पादन (Soybean production) आणि दर्जा चांगला राखण्यासाठी पावसाचा अंदाज घेऊन काढणीला सुरवात करावी. बियाणातील ओलावा 15 टक्के असतानाच कापणीला सुरवाात करावी लागणार आहे. वेळेवर कापणी केल्यास पिकाचा खराबा होत नाही शिवाय उत्पादनातही वाढ होते. काढणी केलेले पिक ऊनामध्ये चांगल्या प्रकारे वाळवणे महत्वाचे आहे. बराच काळ गंज लावून ठेवली तर बुरशी लागण्याचा धोका असतो त्यामुळे काढणी झाली का वेळेत मळणी ही गरजेची आहे.
मळणी करताना अशी काळजी घ्या –
मळणी यंत्राची फेरे 300 ते 400 प्रति मिनीट असणे आवश्यक आहे. मळणीच्या दरम्यान बियाणावर लक्ष ठेवावे. त्यामुळे त्याची डाळ होणार नाही. शिवाय डाळ होण्याचे प्रमाण जर जास्त असेल तर मशीनचा वेग हा कमी करावा.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा