कृषी बातम्या

शेतीला आधुनिकतेची जोड! करा ‘या ‘ नव्या पर्यायी उपयोजना आणि मिळवा भरघोस उत्पादन..

Add modernity to agriculture! Make 'Ya' new alternative deployment and get plenty of product ..

केंद्र सरकारने नुकत्याच आणलेल्या कृषी व पणन मधील कायद्यांमधील बदलाला विरोध होत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मोठे शेतकरी किंवा भांडवलदारांच्या खिश्यामध्ये शेती जाईल म्हणून शेतकरी आंदोलन करत आहेत. परंतु याची दुसरी बाजू विचारात घेता महाराष्ट्रमध्ये 80 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. यातील बरीचशी शेती ही पाण्यावर अवलंबून आहे व ती जिरायत आहे.

काही शेतकरी वगळता बाकीचे शेतकरी नेहमीच आर्थिक तणावात असतात. शेती करणे व त्याच्यासाठी नवीन औषधे, अवजारे, लागणारे बी-बियाणे यांच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. त्यामुळे शेती करणे शेतकऱ्याला परवडेना झाले आहे. यामध्ये बहुतांश शेतकरी पारंपरिक पिके घेत असतात वेळेवर शेतीचे मजूर देखील मिळत नाही, उत्पादनाच्या मानने आणि बाजार भाव मिळत नाही. पैश्याच्या अभावी शेतीची कोणतीच कामे वेळेवर होत नाही. त्यातच गारपीट,अवकाळी पाऊस, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे ही शेतीचे नुकसान चालूच असते. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना असे नैसर्गिक धक्के पचवता येत नाहीत. मजुरीचे दर देखील वाढले आहे, कमी उत्पन्नात कमी दरामुळे शेती तोट्यात जात आहे.

त्यामुळे काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या समस्येचा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांनी एकत्र येऊन शेती करणे याला गट समूह शेती असे म्हणतात. पण गट समूह शेती फारच कमी ठिकाणी चाललेली आहे. काहीजणांनी कंपनीसोबत सोबत करार करून देखील पाहिला परंतु त्यांना फार चांगले अनुभव आले नाहीत. काही शेतकरी उत्पादक कंपन्या केवळ नावं रूपाला राहिल्या आणि काही कंपन्या चांगले काम करत देखील आहेत. बहुतांशी शेतकरी कंपन्या माल साठवणूक करण्यात गुंतून राहिल्या. योग्य नियोजन सुबद्ध कार्यप्रणाली यांचा यामध्ये बरेच अभाव दिसू लागला.

शेतीमधील असंख्य अडचणीला कंटाळून शेतकरी बटाईने शेती देत असतात. बटाई शेती म्हणजे एक प्रकारचा शेती करार असतो. दोन शेतकरी एकत्र येऊन एक,दोनवर्षाकरिता शेती करार करत असतात. पण यामध्ये सुद्धा पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते व त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव दिसून येतो.

अशावेळी गाव व गावातील प्रतिष्ठित शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन उत्पादन कंपनीची स्थापना करावी. सामूहिक शेतीच्या माध्यमातून पिकाचे उत्पादन घ्यावे त्यासोबत प्रगत तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास भरघोस उत्पादन मिळेल. उत्पादन कंपनीच्या माध्यमातून शेतीमालाची विक्री व मूल्यवर्धन याची सोय ठरेल. मालाला मार्केटिंग तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेती व्यवसाय सुद्धा यशाचा शिखर गाठू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button