“लिकिंग” करून खते विकल्यास होणार यांच्याकडून कारवाई…
Action will be taken against those who sell fertilizers by "leaking"
अकोला: सोमवारी जिल्हा कृषी निविष्ठा संनियंत्रण (Agricultural inputs monitoring) समितीची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत डॉक्टर मुरली इंगळे जिल्हा कृषी विकास अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याबरोबर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीकांत आप्पा खोत, सहाय्यक व्यवस्थापक पणन सचिन कातखेडे, विभागीय व् व्यवस्थापक महाबीज जगदीश सिंग खोकड, जिल्हा कृषी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष मोहन सोनवणे, प्रभाकर मानकर, सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने आदी उपस्थित होते.
या बैठकीत खते (Fertilizers) खरेदी करताना लिंकिंग करून विक्री (selling) केल्याची तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी लिंकिंग करून खते विकल्यास (If the fertilizer is sold by linking) विक्रेत्याचा विरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अन्वये ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
खरीप हंगामाच्या (Kharif Season) तयारीचा भाग म्हणून शेतकरी बियाणे (seeds), खते यांची खरेदी करत असतात. पण खते विक्रेते हे शेतकऱ्यांना बळजबरीने विविध प्रकारची खते घेण्यास भाग पाडत आहेत.अशाप्रकारे लिकिंग करून विक्री केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करा तक्रार…
कोरोना च्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक भार सहन करावा लागू नये. खते विक्रेत्यांनी शेतकर्यांना लिंकिंग करून खते विकल्यास किंवा खते घेण्यास भाग पाडल्याससंबंधित तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे (Complaint to Taluka Agriculture Officer) शेतकऱ्यांनी करावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. अनावश्यक खतांचा (Of unnecessary fertilizers) वापर केल्यामुळे शेतीचा पोत खराब होतो आणि पिकाचे नुकसान होऊ शकते.
जुन्या मालाची विक्री जुन्या दराने व्हावी.. जिल्ह्यामध्ये सध्या जुन्या खतांचा साठा शिल्लक आहे, तो माल जुन्या दरानेच विकला जावा यावर यंत्रणेचा कटाक्ष असणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी जुनी खते जुन्या दरानेच विकत घ्यावीत.
हेही वाचा: पीक काढणीनंतर ची सगळी कामे होतील या एकाच मशीन ने, जाणून घ्या यंत्राबद्दल ची संपूर्ण माहिती…
सोयाबीनचे बी कोणते वापरायचे…. जिल्ह्यामध्ये सोयाबीनची लागवड ही शेतकऱ्यांनी घरच्याच बियांतून करावी. फक्त त्याआधी सॅम्पल बी (Sample bee)टाकून ते उगवते का नाही ते चेक करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काय नाय हंगामात बियाणे आणि खतांची टंचाई भासू नये यासाठी सर्व यंत्रणांनी सावध राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
शेतातील पिवळ सोन चमकलं! सोयाबीनला प्रथमच हमीभावपेक्षा मिळतोय दुप्पट भाव…