ताज्या बातम्या

Baramati Agro | मोठी बातमी! बारामती ऍग्रोवर कारवाई! 72 तासांत बंद करण्याची रोहित पवार यांना रात्री 2 वाजता नोटीस

Big news! Action on Baramati Agro! Notice to Rohit Pawar at 2 am to close within 72 hours

Baramati Agro | बारामतीमधील बारामती अॅग्रो या कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण विभागाने कारवाई केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ही कंपनी आहे. कंपनीला 72 तासांत बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. रोहित पवार यांनी या कारवाईवर राजकीय हेतूचा आरोप केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली.”

रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवार म्हणाले की, “मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे.”

Agriculture Week Baramati | पवारांच्या बारामतीत दिसणार कृषी पॉवर! आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी भरणार कृषक सप्ताह….

रोहित पवार म्हणाले की, “हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही.”

रोहित पवार प्रतिसाद नाही
रोहित पवार यांच्या आरोपांवर अद्याप कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big news! Action on Baramati Agro! Notice to Rohit Pawar at 2 am to close within 72 hours

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button