राशिभविष्य

Vastu Shastra | तुम्हाला माहितीये का? वास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला पैसे ठेवल्यास सर्व अडचणी होतात दूर

Vastu Shastra | आपल्याला जीवनात भरपूर यश, पैसा मिळावा, घरात सुख-समृद्धी नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि प्रत्येक जण त्या दृष्टीने प्रयत्न देखील करत असतो; पण काही जण हातात पैसा टिकत नाही, कर्ज, उधारी घ्यावी लागते, विनाकारण खर्च वाढतोय, अशा स्वरूपाच्या तक्रारी करत असतात.

यासाठी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र जाणकारांचा सल्लादेखील घेतला जातो. परंतु वास्तुशास्त्रानुसार घराची रचना जर सदोष असेल, घरातल्या वस्तूंच्या जागा चुकीच्या असतील, तर धन अर्थात पैशासंबंधी अडचणी जाणवू शकतात. यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. या उपायांमुळे आर्थिक अडचणी दूर होतात, घरात पैसा टिकतो, लक्ष्मीमातेचा वास राहतो, असं वास्तु तज्ज्ञ सांगतात.

वाचा: बाप रे! 17 महिने मृतदेहासोबत राहिले कुटुंबीय; जिवंत समजून मृतदेहावर खर्च केले 30 लाख अन् सत्य समजताचं…

घरात कोठे ठेवावे पैसे?

तर मग यासाठी वास्तुशास्त्रातल्या काही नियमांचं पालन करणं हे गरजेचं आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. तुम्ही जर पैसे, सोनं, चांदीचे दागिने घराच्या दक्षिण दिशेला ठेवत असाल तर यामुळे फारसं नुकसान होणार नाही; पण भरभराट देखील होणार नाही.
त्यामुळे या गोष्टी दक्षिण दिशेला ठेवणं टाळावं. घरातलं कपाट, तिजोरी, पैसे पूर्व दिशेला ठेवणं शुभ असतं. यामुळे संपत्तीत सातत्यानं वाढ होते. तसेच घराच्या उत्तर दिशेला असलेल्या खोलीत दक्षिण दिशेला असलेल्या भिंतीला कपाट किंवा तिजोरी ठेवावी. कपाट किंवा तिजोरीचं दार उत्तर दिशेला उघडेल असं असावं. यामुळे पैसा, धन सातत्याने वाढतं. घरातल्या उत्तर दिशेला पैसा, सोनं-चांदी ठेवणं शुभ मानलं जातं. कारण ही दिशा कुबेराची असते.

वाचा: शेतकऱ्यांनो ‘या’ भागात कोसळणार विजांसह पाऊस, पिकाची काळजी घेण्यासाठी वाचा महत्वपूर्ण कृषी सल्ला

वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही पैसा, सोनं-चांदीचे दागिने पश्चिम दिशेला ठेवले, तर ते फारसं फलदायी ठरत नाही. कारण घरातल्या कर्त्या व्यक्तीला पैसा कमावताना मोठ्या कष्टांना सामोरं जावं लागतं. याचाच अर्थ या दिशेला पैसा ठेवला तर धनलाभ कमी प्रमाणात होतो. घरातल्या आग्नेय कोपऱ्यात कधीही पैसे, सोनं-चांदीची दागिने कधीही ठेवू नयेत. कारण या दिशेला धन ठेवल्यास त्यात वाढ होण्याऐवजी घट होते. त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती निर्माण होते. तसंच कायम कर्जाचं ओझं राहतं. घराच्या ईशान्य कोपऱ्यात धनसंपत्ती ठेवली तर घरातला कर्ता माणूस बुद्धिमान म्हणून ओळखला जातो. तसंच या कोपऱ्यात पैसा, दागिने आदी गोष्टी ठेवल्या तर त्यात सातत्यानं वाढ होत राहते, असं वास्तुशास्त्राचे जाणकार सांगतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Do you know If you keep money in ‘this’ direction according to Vaastu Shastra, all your problems will be removed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button