Abhay Yojana | राज्य सरकारचा मोठा निर्णय! मुद्रांक शुल्क दंडात मिळणार सवलत; ‘ही’ योजना राबविण्यास सवलत
Big decision of the state government! Concession in stamp duty penalty; Exemption for implementation of 'this' scheme
Abhay Yojana | मुद्रांक शुल्क कमी भरल्याने त्यावर दंड आकारून ती वसुलीची कार्यवाही सुरू असलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दंड सवलत अभय योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. या योजनेनुसार, १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील दस्तांसाठी, तर १ जानेवारी २००१ ते २०२० या कालावधीतील दस्तांसाठी असे दोन गटांसाठी स्वतंत्र योजना असणार आहे.
मुद्रांक शुल्क आणि दंड
पहिल्या गटातील दस्तांमध्ये, जर मुद्रांक शुल्क आणि दंडाची रक्कम एक लाख रुपयांच्या आत असेल, तर त्यांचे मुद्रांक शुल्क आणि दंड पूर्ण माफ करण्यात येणार आहे. तर एक लाख रुपयांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्क थकीत असेल, तर त्यांना मुद्रांक शुल्काच्या रकमेत २५ टक्के आणि दंडाची रक्कम २० टक्केच भरावी लागणार आहे.
वाचा : Land Award Certificate | जमीन बक्षीसपत्र म्हणजे काय असते? ते कसे बनवतात? शेतकऱ्यांनो जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर
दुसऱ्या गटातील दस्तांमध्ये, जर मुद्रांक शुल्क २५ लाख रुपयांच्या आत असेल, तर त्यांना मुद्रांक शुल्कात २० टक्के आणि दंडात १० टक्के कपात करण्यात येणार आहे. तर २५ लाख रुपयांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्क थकीत असेल, तर त्यांना सरसकट २५ लाख रुपये दंड आणि मुद्रांक शुल्काची वीस टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
ही योजना दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिला टप्पा १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ आणि दुसरा टप्पा १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ असेल. या योजनेमुळे मुद्रांक शुल्क थकीत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, राज्य सरकारलाही महसुली उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
Web Title: Big decision of the state government! Concession in stamp duty penalty; Exemption for implementation of ‘this’ scheme
हेही वाचा