कृषी बातम्याकृषी सल्ला

Panchasutri technology| आडसाली ऊस: पंचसूत्री तंत्रज्ञानाचा वापर करून वाढवा उत्पादन|

Panchasutri technology| महाराष्ट्रात ऊस हे एक प्रमुख नगदी पीक असून, आडसाली हंगामात त्याची लागवड वाढत आहे. राज्याचे हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आहे आणि योग्य तंत्रज्ञान वापरल्यास उत्तम उत्पादन मिळू शकत.

आडसाली ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी खालील पंचसत्री तंत्रज्ञान (Panchasutri technology) महत्त्वाचे आहे

1. जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन:

  • जमिनीची चांगली मशागत (Cultivation) करून त्यात सेंद्रिय खत टाकावे.
  • जमिनीची चाचणी घेऊन त्यानुसार आवश्यक खते द्यावीत.
  • योग्य जलसंधारण तंत्रज्ञान वापरून जमिनीतील ओलसरटपणा टिकवावा.

2. सुधारित ऊस वाण आणि दर्जेदार बियाणे:

  • को 86032 (निरा), फुले 265, फुले ऊस 15012, फुल ऊस 13007 आणि व्हीएसआय 8005 यांसारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या ऊस वाणाची निवड करावी.
  • 9 ते 11 महिने वयाचे, अनुवांशिकदृष्ट्या (Genetically) शुद्ध आणि निरोगी बियाणे वापरावे.
  • दर तीन वर्षांनी बियाणे बदलावे.

वाचा:  New opportunity| मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना: तरुणांसाठी नवी संधी|

3. 5 फूट सरीमध्ये रोप लागवड तंत्रज्ञान:

  • रिजरच्या सहाय्याने 150 सेंमी (भारी जमीन) आणि 120 ते 135 सेंमी (मध्यम जमीन) अंतरावर सऱ्या पाडाव्यात.
  • एका डोळ्यावर 1 फूट अंतरावर किंवा दोन डोळ्यांच्या टिपऱ्यांमध्ये अर्धा फूट अंतर ठेवून लागवड करावी.
  • जोडओळ पट्टा पद्धतीने लागवड (Cultivation) करण्यासाठी 2.5 फूट (मध्यम जमीन) आणि 3 फूट (भारी जमीन) अंतरावर सऱ्या पाडाव्यात.
  • रोपांनी लागवड करताना सरी ओली करून किंवा रोप पाण्यात दाबून लागवड करावी.

4. ठिबक सिंचनद्वारे पाणी आणि खत व्यवस्थापन:

  • पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि खतांचा यग्य वापर करण्यासाठी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करावा.
  • गरजेनुसार आणि योग्य प्रमाणात पाणी आणि खते द्यावीत.

5. तण नियंत्रण आणि आंतरमशागत:

  • पेरणीनंतर आणि उगवणीनतर योग्य वेळी तणनाशकांचा वापर करून तण नियंत्रण करावे.
  • वेळीच आंतरमशागत करून जमिनीची भुसभुशीतता टिकवावी आणि हवा खेळती ठेवावी.

या पंचसूत्री तंत्रज्ञानाचा वापर करून आडसाली ऊस उत्पादनात 15 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ करता येईल. तसेच, योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाद्वारे ऊस शती अधिक आर्थिकदृष्ट्या (Financially) फायदेशीर बनवता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button