Aadharcard | आधार कार्ड ठेवणार व्यक्तीची जन्मापासून मृत्यूपर्यंतची नोंद! जाणून घ्या काय होणार सरकारच्या नव्या योजनेचा फायदा?
Aadharcard | आता सध्याच्या काळात भारतामध्ये आधारकार्ड हे अत्यंत महत्वाचा दस्ताऐवज ठरत आहे. कारण प्रत्येक गोष्टीसाठी आधारकार्डची आता गरज लागते. आता आधारकार्ड हे सरकारी कामापासून ते बॅकिंग आणि इतर कामासाठी देखील सक्तीचे झाले आहे.
त्यामुळे आधारकार्डमधील आपली माहिती ही वेळोवेळी अपडेट करत राहणे सध्याच्या काळाची गरज बनली आहे. तसेच आता युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून आधारकार्ड संबंधित सर्व प्रकारची अपडेट ही वेळोवेळी दिली जात असते. त्यामुळे आता UIDAI आधारशी संबंधित आणि फसवणूक थांबवण्यासाठी एक चांगली योजना आणली जात आहे.
काय आहे ही नवीन योजना?
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) आता सध्या जन्म आणि मृत्यू डेटा आधारशी लिंक करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच या अंतर्गत, आता नवजात बालकांना देखील तात्पुरता आधार क्रमांक दिला जाणार असून नंतर तो बायोमेट्रिक डेटासह अपग्रेडही केला जाणार आहे. पण एवढेच नाही तर मृत्यूची नोंद देखील आधारकार्डशी जोडली जाणार आहे. त्यामुळे आता आधार क्रमांकांचा होणारा गैरवापर देखील रोखता येणार आहे.
म्हणजेच आता प्रत्येक व्यक्तीचा जन्म ते मृत्यूपर्यंतचा डेटा हा बेसमध्ये जोडला जाणार आहे.
वाचा:आनंदाची बातमी! 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी आली; त्वरित तपासा तुमचं नाव आलं का?
काय होणार या योजनेचा फायदा?
आधरकर्डशी संबंधी आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली असून ज्यामध्ये लाभार्थीच्या मृत्यूनंतरही त्याचा आधारकार्ड वापरुन गैरवापर केला जात आहे.
त्यामुळे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या ग्राहकांच्या फायद्यासाठी अनेक नवनवीन योजना आणल्या जात असतात. तसेच आता युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून झिरो आधार कार्ड वाटप करण्याचा देखील विचार केला जात आहे. या योजनेमुळे आता बनावट आधार क्रमांक तयार होणार नाही, म्हणजेच कोणत्याही प्रकारची फसवेगिरी देखील होणार नाही. त्यामुळे आता एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त आधार क्रमांकाचे वाटप करताच येणार नाही. तसेच ज्यांच्याकडे जन्म, वास्तव्य किंवा उत्पन्नाचा कोणताही पुरावा नाही अशा लोकांना झिरो आधार क्रमांक दिला जात असतो.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- Features of the Mortgage Loan
- शेतकऱ्यांनो उडीद गाजवतंय मार्केट! तर सोयाबीनच्या दरात झाली वाढ? जाणून घ्या शेतमालाचे ताजे बाजारभाव
Web title : The government’s new plan! Now Aadhaar card will keep record from birth to death