एकच वनस्पती त्याचे दोन फायदे, ही अशी वनस्पती आहे तिच्यामुळे जनावरांसाठी पशुखाद्य व शेतात उत्तम खत या दोन्ही गोष्टींचा फायदा मिळणार आहे(Both animal feed and good manure in the field will benefit). अझोला ही पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे. अझोला(AZOLA) या वनस्पतीचा लागवडीचा खर्च फार कमी असल्यामुळे तो शेतकऱ्यांना परवडणारा सुद्धा आहे.
अझोला या वनस्पती मध्ये तांबे, कॅल्शियम ,फॉस्फरस , पोटॅशियम खनिज पदार्थ आढळून येतात(Minerals like copper, calcium, phosphorus, potassium are found). या वनस्पतीमध्ये प्रोटीन चे प्रमाण कमी असल्यामुळे जनावरांना सुलभ पद्धतीने पचन होते. अझोला घन आहारात मिसळून सुद्धा जनावरांना देऊ शकतो. तसेच हा चारा जनावरांसाठी गुणकारी आणि परिणामकारक बनवला आहे. अझोला कल्चर (AZOLA culture) ही पद्धत तालुका कृषी विभागाकडे (To Taluka Agriculture Department) उपलब्ध आहे.
या प्रकल्पाला लागणारी खर्च हा कमी आहे. प्रकल्प खर्च 300 ते 400 रुपये प्रति खड्डा असून तो एकदाच करावा लागतो. दुभत्या जनावरांना सुद्धा या वनस्पतीचा खाद्य म्हणून वापर होतो. यामुळे 15 ते 20 टक्के दुग्ध उत्पादनात वाढ (15 to 20 percent increase in milk production) होते.
याचबरोबर शेळ्य, मेंढ्या (Goats, sheep) यांनासुद्धा हे खाद्य उपयोगी आहे. तसेच मांसल कोंबड्या, अंडी देणाऱ्या कोंबड्या (Hens) यांनासुद्धा हे खाद्य देऊ शकतो.
लागवड कशी करावी:(How to plant:)
जमिनीमध्ये तीन फूट बाय सहा फूट रुंदीचा चा खड्डा घेऊन तो वीस सेंटीमीटर खोल करावा. त्यात खताच्या रिकाम्या पिशव्या टाकाव्यात. एक पातळ प्लास्टिकची सिल्पोलीन शीट पूर्ण खड्डा झाकेल अशी टाकावी. या शीट वर दहा ते पंधरा किलो माती टाकावी. दहा लिटर पाण्यात दोन किलो शेण, 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण करून ते मातीवर टाकावे. पाण्याची पातळी 10 सेंटीमीटर पर्यंत पोहोचली एवढे पाणी टाकावे. या पाण्यात अर्धा ते एक किलो शुद्ध व ताजी अझोला कल्चर पसरवून त्यावर थोडे पाणी शिंपडावे. एक दोन आठवड्यात पाच ते 20 सेंटिमीटर सर्वत्र पसरतो. 20 ग्रॅम सुपर फॉस्फेट व एक किलो शेण ५५ दिवसात मिसळावे. त्यामुळे अझोला ची वाढ लवकर होते.
हे ही वाचा….