ताज्या बातम्या

Milk Rate | शेतकऱ्यांना फटका! राज्यातील खासगी-सहकारी दूध संघांकडून गाईच्या दूध दरात ‘इतक्या’ रुपयांची कपात

Hit the farmers! Reduction in cow milk price by private-cooperative milk unions in the state by 'so much' Rs

Milk Rate | गोकुळ दूध संघानंतर आता राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांनीही गाय दुधाच्या दरात 2 रुपयांची कपात जाहीर केली आहे. ही कपात 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे दूध उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे. देशात आणि राज्यात गाईच्या दुधाचे (Milk Rate) उत्पादन वाढले असून, मागणी घटली आहे. बटर आणि पावडरचे दर कमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ही दर कपात जाहीर करण्यात आली आहे.

दुधात कपात
यापूर्वी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानेही गाईच्या प्रतिलिटर दरामध्ये दोन रुपयांची कपात जाहीर केली होती. तर, म्हैस दुधासाठी प्रतिलिटर दीड रुपयांची वाढ केली आहे. राज्यातील गाय दुधाचे वाढते उत्पादन पाहता, पुरवठ्याएवढी मागणी होत नाही. यामुळे दूध उत्पादकांना आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे दूध संघांनी दर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दूध उत्पादकांच्या उत्पन्नात घट होणार आहे. यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे.

वाचा : Milk Rate | दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका! दूध खरेदी दरात ‘इतक्या’ रुपयांची कपात, जाणून घ्या किती मिळणार भाव?

बैठकीत हे निर्णय घेण्यात आले
सांगली येथे झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. बैठकीस श्रीपाद चितळे, किरीट मेहता, नेताजी पाटील, विशाल पाटील, शितल थोटे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत उत्पादकांना नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचेही निर्देश देण्यात आले.

हेही वाचा :

Web Title: Hit the farmers! Reduction in cow milk price by private-cooperative milk unions in the state by ‘so much’ Rs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button