पशुसंवर्धन

Animal Husbandry |जनावरांची गर्भधारणा तपासण्यासाठी प्रेग्नेंसी किट विकसित! केवळ ‘इतक्या’ दिवसांतच होणार खात्रीशीर तपासणी, जाणून घ्या सविस्तर

Animal Husbandry | आजच्या आधुनिक युगात कधी कशाचा शोध लागेल हे काही सांगता येत नाही. आजपर्यंत तुम्ही महिलांची गर्भधारणा तपासण्यासाठी प्रेग्नेंसी किटचा वापर केल्याचं ऐकलं असेल. मात्र, शेतकरी (Agriculture) मित्रांनो तुम्ही कधी जनावरांची (Animals) गर्भधारणा तपासण्यासाठी अशाच प्रेग्नेंन्सी किटचा वापर केला जाईल असा विचार कधी केलाय का? अर्थात नसेलच. पण आता विज्ञान खूप पुढे गेले आहे. आता चक्क जनावरांची गर्भधारणा तपासण्यासाठी प्रेग्नेंन्सी किट (Animal Pregnancy Kit) विकसित करण्यात आले आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

वाचा: दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार तब्बल 10 लाख, जाणून घ्या सविस्तर

ओळख आणि किट द्वारे गर्भधारणा तपासण्याची पद्धत
रॅपी व्हिज्वल प्रेग्नेंसी किट या नावाने हे किट विकसित झाले आहे. हे किट अमेरिकेतील आयडीएक्स या लॅबने विकसित केले आहे. या किटच्या सहाय्याने तुम्ही सहज जनावरे गाभण आहे की नाही याची खात्री करू शकता. यासाठी तुम्हाला जनावराचे केवळ 2 मिली रक्त घ्यावे लागेल आणि या रिएजंट किटमध्ये टाकून तपासावे लागेल. त्यानंतर जर याचा नीळा रंग झाला तर गर्भधारणा झाली आहे असे निदान होते. जर याचा पांढरा रंग झाला तर गर्भधारणा झाली नाही असे समजते.

स्वतःचा दुग्धव्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी! आता सरकारही शेतकऱ्यांना देतंय ‘इतकं’ अनुदान; त्वरित करा अर्ज

किती दिवसांत करू शकता तपासणी?
तुम्ही जनावरे गाभण आहे की नाही हे हे तपासण्यासाठी कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक रेतन केल्यानंतर केवळ 28 दिवसांचा कालावधी लागतो. तर साध्या पद्धतीने गर्भधारणा तपासण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वेळ दोन्ही खर्च होतो. आता या किटमुळे सहज गर्भधारणा तपासता येणार आहे. तसेच या एका किटमध्ये 96 रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करता येईल. या किटद्वारे तपासणी करून पुन्हा 3 महिन्यांनी जनावरांची गर्भधारणा तपासणी केली असता 100 टक्के खात्रीशीर निदान झाल्याचं स्पष्ट झाले आहे. हे किट पशुपालकांसाठी फायद्याचं ठरणार आहे.

वाचा: पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार तब्बल 15 लाख; जाणून त्वरित करा अर्ज

किटसाठी मिळतंय अनुदान
या किटची मूळ किंमत 244 रुपये इतकी आहे. तर कोल्हापूर दूध संघाकडून यासाठी अनुदान दिले जात आहे. जेथे हा प्रयोग करून पाहिला आहे. अनुदावर हे किट शेतकऱ्यांना 184 रुपयांना मिळणारं आहे. या किटचे मोठे फायदे देखील आहे. कारण यामुळे लवकरच जनावर गाभण आहे का समजणार आहे. तसेच शेतकऱ्यांना गाभण जनावरांची काळजी घेणे सोयीचं होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Pregnancy kit developed to check animal pregnancy! A sure check will be done only in ‘so many’ days, know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button