अचलपूर चे असणाऱ्या गणेश हिंगणीकर या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत तालुक्यात पहिल्यांदा शतावरी या औषधी वनस्पतीच्या पिकाची तीन एकरात लागवड केली आहे. ते अल्पावधीतच लाखोंचे उत्पन्न घेत शेती क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण करणार आहेत.
का लावावी शतावरी…
बाजारपेठेत या वनस्पतीला असलेली मागणी पाहता शेतकऱ्यांना हे पीक फायदेशीर ठरणारे आहे. शतावरीला बारा महिने चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शतावरीची शेती ची लागवड करावी.
एकरी १० लाख रुपयांचे उत्पन्नही अपेक्षित…
मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर केवळ १८ महिन्यात तब्बल एकरी १० लाख रुपयांचे उत्पन्नही अपेक्षित आहे. शतावरी ही औषधी वनस्पती असून मागणी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे यातून चांगले उत्पन्न मिळते.
WEB TITLE: A new pattern of cultivation of this plant asparagus; 10 lakh per acre income is expected in 18 months …