कृषी सल्ला

“या” इन्स्टिट्यूटच्या वतीने नवीन केंद्र उभारण्यात येणार; शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जाणार ही उत्पादने..

मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नवीन केंद्राच्या (New center)योजनांचा लाभ होणार आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात पाथरवाला (ता. अंबड) येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) वतीने नवीन केंद्र उभारण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. ज्यामध्ये ७१ कोटी १६ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. प्रशासकीय इमारत, प्रयोगशाळा, प्रशिक्षण केंद्र इत्यादी सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे.

वाचा – पेरणीपासून काढणीपर्यंतचे यांत्रिणीकरण विकसित; या शेतकऱ्याचे आगळेवेगळे प्रयोग पहाच..

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) सभागृहात मंगळवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सहकार मंत्री, गृह मंत्री, जलसंपदा मंत्री, आरोग्य मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, (Vasantdada Sugar Institute) चे महासंचालक शिवाजीराव देशमुख, विशेष कार्यकारी अधिकारी संभाजी कडू पाटील हे सर्व या वेळी उपस्थित होते.

वाचा –

जैविक उत्पादने शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करणार –

‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ ची सर्व उत्पादने, निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी विक्री व्यवस्था सक्षम करण्यात येणार आहे. त्यासाठी साखर कारखान्यांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. तसेच, शेतकरी गटांचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. विविध प्रकारच्या उसाच्या जातींची लागवड करण्यात येणार आहे. ‘व्हीएसआय’ची जैविक उत्पादनेही शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी विक्री व्यवस्थेकडून केली जाणार आहे. या बैठकीत इ विषयावर चर्चा केली गेली.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button