
भाजी पाल्यांचे दर पाहून केंद्र सरकारने (Central Government) मोठा निर्णय घेतलेला आहे. आपण पाहतोय की सध्या टोमॅटो दराची परिस्थिती वाईट चालू आहे. टोमॅटो दर (Tomato rates) पाहून शेतकरी हवालदिल झालेला आहे. कमी दर पाहून रस्त्यावर टोमॅटो फेकण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आलेली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून, शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने MIS योजनेचा निर्णय घेतलेला आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्यात सूचना केली आहे, MIS योजनेअंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांचा टोमॅटो खरेदी करावा. हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य सरकार टोमॅटो खरेदी विक्री (Buy and sell tomatoes) करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने राज्य सरकार वर सोपवली आहे. टोमॅटो व्यवहारात जर राज्य सरकारला तोटा झाला तर केंद्र सरकार 50 टक्के वाटा राज्याला देईल अशी माहिती भारती पवार यांनी दिली.
केंद्र सरकारचा निर्णय –
MIS (Market Intervention Scheme) योजनेअंतर्गत राज्यसरकारकडे टोमॅटो खरेदी विक्रीची जबाबदारी दिलेली आहे. आता शेतकऱ्यांना टोमॅटो विक्रीची चिंता करण्याची काही गरज नाही. या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. शेतकरी आता टोमॅटो दर विक्री (Selling tomatoes at a rate) बाबत निश्चित राहिलं. टोमॅटो निर्यात चालू असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पुरवठा वाढल्यामुळे मागणी घटली व टोमॅटोची विक्री 2 , 4 रुपये किलोने शेतकऱ्यांना बाजार समितीत विक्री करावी लागत होती.
2,3 रुपये दराने शेकऱ्याच्या पिकाचा खर्च निघत नसल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावे लागत होते. केंद्र सरकारने टोमॅटो विक्रीचा (Selling tomatoes) प्रश्न मिटवला आहे. आता शेतकऱ्यांचा विचार करून केंद्रसरकारने निर्णय घेतल्यामुळे शेतकरी आता निश्चित आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –