आगळीवेगळी बँक! “गोट बँक कारखेडा” पाहुयात कशी कार्यप्रणाली चालते ‘या’ बँकेमध्ये…
A different bank! Let's see how "Goat Bank Karkheda" works in 'Ya' Bank
तुम्ही पैशाची देवाणघेवाण करणारी बँक ऐकली असेल जशी की स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र , पण तुम्ही कधी ऐकली का? गोट बँक (goat bank) मग पाहुयात वेगळ्या पद्धतीची बँक म्हणजेच ‘ गोट बँक ऑफ कारखेडा‘. ही बँक(Bank) महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात आहे. दोन वर्षापूर्वी निर्माण झालेल्या या बँकेला अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. या अनोख्या उपक्रमाची सुरुवात नरेश देशमुख नावाच्या एका शेतकऱ्यांनी केली आहे.
या गोड बँकेमध्ये या परिसरातील शेतकरी व मजूर वर्ग बाराशे रुपये च्या एग्रीमेंट वर एक गर्भवती बकरी घेऊन जाऊ शकतात. यामध्ये एकच अट आहे चाळीस महिन्यानंतर, बकरी चार करडासह बँकेला परत करायचे आहे.
ही बँक सामान्य बँकेप्रमाणे चालते.अकोला जिल्ह्यातील बाराशे पेक्षा जास्त डिपॉझिटर या बँकेमध्ये आहेत. नरेश देशमुख म्हणतात की भारतामध्ये 100 गोट बँक उघडण्याचे त्यांचे स्वप्न आहे. व येत्या दहा वर्षांमध्ये ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल.तसेच महाराष्ट्रात देखील गोट बँक करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. लवकरच ते पूर्ण होईल.