Agriculture business |दिवसेंदिवस शेती तंत्रज्ञानात ( Agriculture Technology) प्रगती होत आहे. यामुळे आजकाल नोकरी सोडून शेतीकडे वळणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले आहे. कोव्हिडं नंतर तर बहुतेक तरुणांनी आपली नोकरी सोडून गावचा रस्ता धरत चांगली कमाई केली आहे. नांदेड (Nanded) मधील पावडे दाम्पत्य यातीलच एक आहे.
वाचा: विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर
नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय
या दाम्पत्याने आपली चांगली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतीक्षेत्रावर आधारित स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. यामधून या दोघांना महिन्याकाठी दीड लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. शेवग्याच्या पानापासून पावडर विकण्याचा व्यवसाय या दाम्पत्याने सुरू केला आहे. त्यांनी बनवलेल्या या पावडरला पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठी मागणी आहे.
कमी पैशात मिळते जास्त उत्पन्न
राज्यातील डॉक्टर आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात ही पावडर खरेदी करीत असल्याची माहिती पावडे दाम्पत्यांनी दिली आहे. पावडे दाम्पत्याने आपल्या शेतात शेवग्याची मोठ्या प्रमाणात लागवड करून हा व्यवसाय सुरू केला आहे. कमी पैशात जास्त उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे.
म्हणून सुरू केला व्यवसाय
मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे हे दोघेही आयटी इंजिनिअर असून आतापर्यंत त्यांनी पुणे व हैदराबाद यांसारख्या शहरांत नोकरी केली. याठिकाणी त्यांना चांगला पगार होता. मात्र काहीतरी नवीन करण्याच्या व शेती करण्याच्या उद्देशाने हे दोघेही या व्यवसायाकडे वळाले.
हैदराबाद येथे नोकरीला असताना या दोघांनी शेवग्याच्या शेतीची माहिती घेण्यास सुरुवात केली. यावेळी शेवग्याच्या शेंगा आणि पाल्याचे काय गुणधर्म आहेत ? त्याची लागवड कशी करावी ? त्यातून उत्पन्न किती मिळेल? याची संपूर्ण माहिती त्यांनी जाणून घेतली. त्यांनतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
A couple from nanded started business of drumstick powder
हेही वाचा:
- सरकारी कचेऱ्यांना वैतागलाय! काळजी करू नका, आता मोबाईलवरच मिळणार शेतीचे नकाशे
- चढ की उतार काय आहेत आज तूर ,सोयाबीन, अन् कांद्याचे ताजे बाजारभाव? त्वरित जाणून घ्या
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..