Maratha Reservation | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यात जुंपली; 10 दिवसांत आरक्षण दिले नाहीतर…
Confrontation between Manoj Jarange Patil and Gunaratna Sadavarte over Maratha reservation; Reservation given within 10 days or else…
Maratha Reservation | जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी सरकारला 10 दिवसांत आरक्षणाची घोषणा करण्याचा इशारा दिला. तसेच, आरक्षण न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. या सभेत जरांगे पाटील यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी सदावर्ते यांना मराठा आरक्षणाचा विरोध करणारे म्हणून संबोधले. जरांगे पाटील यांच्या टीकेला आता सदावर्ते यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मराठा आरक्षण दिले तर…
सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी जरांगे पाटील यांच्या सभेला “फक्त जरांगे जत्रा” असं म्हटलं. तसेच, जरांगे पाटील यांच्याकडे संविधानात्मक दृष्टीकोन नसल्याचा आरोप केला. सदावर्ते म्हणाले की, मी खुल्या प्रवर्गाचा वकील आहे. मी मराठा आरक्षणाला कडाडून विरोध करतो. मराठा आरक्षण जर सरकारने दिले तर त्याला मी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईन.
वाचा : Manoj Jarange | मनोज जरांगे यांच्याकडे सभेसाठी तब्बल 7 कोटींचा निधी आला तरी कुठून? जाणून घ्या सविस्तर
मराठा आरक्षणावर खुल्या चर्चेची मागणी
सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर शरद पवारांच्या प्रभावाखाली असल्याचा आरोप केला. त्यांनी जरांगे पाटील यांना पवारांच्या भूमिकेवर बोलत असल्याचं म्हटलं. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खुली चर्चा करण्याची मागणी केली. त्यांनी सरकारला मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा सल्ला दिला.
हेही वाचा :
Web Title: Confrontation between Manoj Jarange Patil and Gunaratna Sadavarte over Maratha reservation; Reservation given within 10 days or else…