शेतकऱ्यांसाठी निसर्गाचं एक वरदान! “बायोगॅस प्लांट” चला जाणून घेऊया या विषयी माहिती…
A boon of nature for farmers! Let's find out about "Biogas Plant"
बायोगॅस प्लांट (Biogas plant) शेतकऱ्यांसाठी वरदान असून, शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणाऱ्या सामुग्री मधून घरगुती गॅस (Domestic gas) तसेच वीज निर्मिती (Power generation)पर्यंत याचा उपयोग होऊ शकतो. बायोगॅस प्लांट लावण्याकरता शासन देखील प्रोत्साहन देत असते व त्यासाठी अनुदान शेतकऱ्यांना प्रधान करते. (The government also encourages the setting up of biogas plants and provides subsidy to the farmers.) आपण या लेखामध्ये बायोगॅस विषयी माहिती पाहणार आहोत.
बायोगॅसची निर्मिती सेंद्रिय पदार्थ (Organic matter) पासून झालेली असते, म्हणजेच मिथेन, कार्बन डाय-ऑक्साइड,अशा अनेक वर्षांपासून बायोगॅसची निर्मिती झालेली असते. आपल्याकडे एक गैरसमज आहे की बायोगॅस निर्मिती फक्त म्हशीचे व गाईच्या शेनापासून (From Shen) होत असते. परंतु याची निर्मिती शेना व्यतिरिक्त . शिळे/ नासके/ वाया गेलेले अन्न, भाजीपाला, गवत (नेपियर ग्रास ), M. S. W. (Municipal Solid Waste ) मधील सेंद्रिय भाग, तेलाची पेंड, तेलबियांचा चोथा, भाताचा कोंडा, गहू/तांदूळ/मका/उस इ. ची चिपाडे, उसाची मळी, प्रेस मड, अन्नप्रक्रिया कारखान्यातील टाकाऊ/उत्सर्जति पदार्थ/घटक, कारखान्यातील सेंद्रिय उत्सर्जति पदार्थ, शेवाळे, जलपर्णी (वॉटर हाय सिंथ), इ. व मानव आणि पशुनिर्मित उत्सर्जति पदार्थ जसे, मल, मूत्र, मांस, इ. व अशा अनेक सेंद्रिय पदार्थापासून बायोगॅसची निर्मिती होऊ शकते.
हेही वाचा : दूधव्यवसाय संकटात! शेतकऱ्यांकडून अवघ्या, ‘इतके’ रुपयात दूध खरेदी…
बायोगॅस आकाराने लहान मध्यम व मोठे स्वरूपात असू शकते, लहान बायोगॅस प्लांट हा घरगुती स्वयंपाका करिता उपयुक्त ठरतो. यामुळे अनेक फायदे होतच तसेच इंधनाची बचत (Fuel saving) देखील होते, व चुलीच्या धुरामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर दुष्परिणाम (Health effects) होतात ते यामुळे टाळतात. तसेच या पासून मिळणारा गॅस स्वस्त दरात प्राप्त होतो.
हेही वाचा : तुम्हाला हे माहित आहे का? पॅन कार्ड मोफत मिळते फक्त दहा मिनिटात असा करा अर्ज…
मोठ्या बायोगॅस प्लांट ची निर्मितीपासून वीज निर्मिती केली जाते. वीजनिर्मिती रोज ३० ते ४० युनिट्सपासून काही मेगावॅट्सपर्यंत असू (Power generation should be from 30 to 40 units per day to a few megawatts) शकते! बायोगॅस शुद्ध करून, त्यातील मिथेन (Methane) व्यतिरिक्त इतर सर्व वायू काढून त्याचा सीएनजीप्रमाणे वापर करता येऊ शकतो. बायोगॅस प्लांट निसर्गाचे वरदान (Biogas plant is a gift of nature) आहे हे म्हणणे वावगे ठरणार नाही.
हेही वाचा :
किमतीपेक्षा अधिक दराने खताची विक्री केल्यास कारवाई होणार; कृषी विभागाकडून इशारा!
LPG Gas Cylinder मिळणार फक्त नऊ रुपयात! पहा : इंडियन ऑईल व पेटीएम कंपनीची कोणती आहे,’ ही ‘ मोठी ऑफर…